तापसी पन्नूचा ‘दोबारा’ चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. ‘दोबारा’चे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले आहे. “सोशल मीडियावर चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा आणि कलाकारांवर टीका करण्याचा ट्रेंड असाच सुरू राहिला, तर ठराविक कालावधीनंतर लोक त्याकडे लक्ष देणार नाहीत,” असे तापसी पन्नूने गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. माझ्या एका चित्रपटातही या विषयाशी संबंधित संवाद आहे.’
वास्तविक, अलीकडेच काही लोकांनी सोशल मीडियावर आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. यानंतर आमिर खानने चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्याने दुःख झाल्याचे सांगितले आणि प्रेक्षकांना आपला चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. तापसी पन्नू म्हणाली, “जर प्रेक्षकांना एखादा चित्रपट आवडला तर ते नक्कीच चित्रपट पाहायला जातील. त्यांना चित्रपट आवडला नाही तर ते पाहणार नाहीत. पण, हिंदी चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणे म्हणजे माझ्या प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेला कमी लेखण्यासारखे आहे.