तेजस्विनीचा जन्म २३ मे १९८६ ला पुण्यात झाला. रणजित पंडित आणि ज्योती चांदेकर हे तिचे आई वडील आहेत.
प्रत्येक कलाकाराला करिअरच्या सुुरुवातीच्या काही ना काही अडचणींना सामोरं जाव लागतं. अनेक वेळा हे कलाकार मंडळी मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्या पुर्वीच्या आयुष्यातील चांगल्या वाईट आठवणींचा उलगडा करतात. असंचा काहीसा किस्सा अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) शेयर केला आहे. ज्याला एकून तुमच्या भुवया उंचावतील यात शंका नाही.
[read_also content=”ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर एकवर, राष्ट्रवादीचं घड्याळही धावलं, शिंदे गट आणि ठाकरे गटात चौथ्या क्रमाकांसाठी लढत https://www.navarashtra.com/maharashtra/grampanchayat-eletion-result-as-par-party-nrps-355080.html”]
सिनेपत्रकार सौमित्र पोटे (Soumitra Pote) यांच्या ‘मित्र म्हणे’ (Mitra Mhane) या पॉडकास्टवरील मुलाखतीमध्ये तेजस्विनीने तिच्या स्ट्रगलिंगच्या काळात तिला आलेल्या अनुभव तिने शेयर केले. तीने सांगितली की, “करिअरच्या सुरुवातीला 2009-2010 साली मी पुण्यात सिंहगड रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होते. मी राहत असलेलं घर एका नगरसेवकाच्या मालिकीचं होतं. एकेदिवशी मी त्या नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये भाडं देण्यासाठी गेले तेव्हा त्याने माझ्याकडे घाणेरडी मागणी केली”.
“त्यावेळी त्याच्या टेबलावर असलेला पाण्याचा ग्लास मी उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकला. तसेच त्याला खडे बोल सुनावले. मी म्हणाले की, जर मी या अशा मार्गाचा स्वीकार केला असता तर मी आज भाड्याच्या घरात राहिले नसते, करिअरच्या सुरुवातीलाच माझं घरं असतं आणि दारात गाड्या असतं. तिच्या या विधानामुळे आता चर्चा होऊ लागल्या आहेत.
[read_also content=”बुडीत बँकांच्या ग्राहकांचे पैसे लवकर मिळण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुलभ व्हावी; सुप्रिया सुळे यांची मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/bank-procedures-should-be-simplified-to-get-the-money-of-customers-of-bankrupt-banks-quickly-demand-of-supriya-sule-nrdm-355100.html”]
2004 साली आलेल्या ‘अगं बाई अरेच्चा’ हा तेजस्वीनीचा पहिला सिनेमा. तेजस्विनीने या सिनेमातून तिच्या करीअरची सुरुवात केली. त्यांनतर ‘मी सिंधुताई सपकाळ’,’तू ही रे’, ‘देवा’, ‘एक तारा’ हे या सिनेमातूून तिच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपूर्वी तेजस्विनीची अनुराधा आणि ‘रानबाजार’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये तेजस्विनी अतिशय हटक्या भुमिकेत दिसली. सध्या तिची ‘बांबू’ या सिनेमाची ती निर्मिती करत असून 26 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणारा आहे.