Atisha Naik Remembers Late Ratan Tata And Baba Amte With Emotional For Them
२०२४ हे वर्ष भारतीयांसाठी खूपच दु:खद ठरलं. विशेषत: ९ ऑक्टोबर २०२४, या दिवशी भारतीय उद्योजक आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने फक्त देशालाच नाही तर, अवघ्या जगाला दु:ख झाले. त्यांच्या कतृत्वाने अवघ्या भारतीयांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. उद्योगपती रतन टाटा आणि समाजसेवक बाबा आमटे यांच्याविषयी सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री अतिशा नाईक हिने भावूक विधान केलं आहे. रतन टाटा आणि बाबा आमटे यांना देवाने अमरत्व द्यावं, त्यांनी आपल्यातून केव्हाच जाऊ नये, असं विधान केलं आहे.
दरम्यान, अभिनेत्रीने आरपार ऑनलाईनला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत अभिनेत्रीने दिवंगत सर रतन टाटा आणि बाबा आमटे यांच्या आदर्शाविषयी भाष्य केलं आहे. शिवाय, त्यांची नावं घेत त्यांना अमरत्व द्यायला हवे, असं म्हटलं आहे. मुलाखतीत अतिशा नाईक म्हणाली की, “रतन टाटा माझ्या आयुष्यातले आदर्श आहेत. मला सर रतन टाटा खूप आवडतात. माझं असं म्हणणं होतं की, परमेश्वराने कोणाला तरी अमरत्व द्यावं. हे खरे लोक आहेत आणि जे तुमच्या अमरत्वाने बदलणार नाहीत. त्यात माझ्यासाठी सर रतन टाटा पहिलं, कदाचित शेवटचं नाव आहे. तो माणूस इतका मोठा आणि महत्त्वाचा आहे की, ते जी पायवाट चालले असतील त्या पायवाटेच्या धुळीचा कण जरी मला मिळाला तरी माझ्या आयुष्यातील खूप गोष्टी या सुकर होतील किंवा मला कळतील. कसं वागावं आणि कसं वागून नये, मला कळेल. आपण आपल्या परिमाणांमध्ये बसून जगतो. त्यामुळे रतन टाटा मला खूप आडवतात.”
“मुलींनी बापाचा खून करायला पाहिजे”, ‘त्या’ घटनेवर अभिनेत्री अलका कुबल कडाडल्या…
मुलाखतीमध्ये पुढे अभिनेत्री म्हणाली की, “मला शिवाय बाबा आमटेही आवडतात किंवा प्रकाश आमटे हे देखील आवडतात. ज्यांनी त्यांच्या कामात स्वतःला अगदी झोकून दिलं आहे. त्यांच्यातला खरेपणा दिसतो. त्यांचं काम दिसतं. कोणी म्हणणार आहे का प्रकाश आमटे अवॉर्ड घ्यायला सिल्कच्या झब्ब्यात का आले नाहीत. त्यांना ते शक्य आहे. अनेक लोक त्यांना मोठमोठ्या गाड्या पुरवतील. पण जो माणूस इतके वर्ष साधेपणातच जगला त्याला नंतर हे सगळं खूप खोटं आणि क्षुल्लक वाटायला लागतं.” दरम्यान, अभिनेत्रीची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. “मनातल्या बोलल्या मॅडम… अगदी चोख आणि थेट… खरंच” असं म्हणत तिच्या विधानाचा कौतुक केलं जात आहे.
Krrish 4: पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार प्रियांका आणि हृतिकची जोडी? ‘क्रिश ४’ बाबत समोर आले अपडेट!
मराठी चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून अभिनेत्री अतिशा नाईकने चाहत्यांचे मनोरंजन केलं आहे. दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेत्रीने मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्रीने ‘घाडगे अँड सून’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘आभाळमाया’ सारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम करत चाहत्यांमध्ये स्वत:चे प्रभूत्व निर्माण केलं. स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतून अतिशी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.