विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश ओक यांनी मतदारांना विचारले दोन ‘भाबडे’ प्रश्न; अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
सध्या राज्यात विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरू आहे. येत्या २० नोव्हेंबरला संपूर्ण राज्यात मतदान होणार आहे. विशेष म्हणजे, राज्यामध्ये २०२२ आणि २०२३ मध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी आपल्याला निवडणूक होताना पाहायला मिळणार आहे. आता निवडणूक म्हटल्यावर, प्रचार सभा होतातच. यामध्येही आश्वासन आणि आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात. यासर्व गोष्टींचा आधार प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.
हे देखील वाचा- “दफन करून आलास ना त्याला…”, नवजात बाळाच्या मृत्यूविषयी बोलताना प्रसिद्ध गायक भावुक
शेअर केलेल्या पोस्टमध्ये, अभिनेते गिरीश ओक यांनी मतदारांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन ‘भाबडे’प्रश्न विचारले आहेत. त्यांचे हे दोन प्रश्न सध्या चाहत्यांचा चर्चेचा विषय ठरला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये डॉ. गिरीश ओक म्हणतात,
” “मला पडलेले दोन भाबडे प्रश्न”
पहिला
एक पार्टी १५०० देतेय दुसरी ३००० देणार म्हणतेय इतरही बरीच पैश्याची आश्वासनं दिली जातायत्, पण हे देतायत्/देणार कुठून आपल्या टोल,आयकर,जीएसटी मधूनच नं ?
मग आपल्याला विश्वासात घेऊन विचारणं सोडाच पण सांगणं तरी.
दुसरा
आणि हे जे एटीएम च्या किंवा इतर गाड्यांमधे पैसे पकडले जातायत् ते असे ॲाड संख्येत म्हणजे १ कोटी २७ लाख किंवा २ कोटी ७० लाख असे कसे आहेत. देणाराही असे का देतोय आणि घेणारालाही असे कसे हवे आहेत. की हे वरचे पैसे म्हणजे पोचवणाऱ्यांचा पोचवण्याचा मेहनाताना आहेत की पोचवताना ते पोचवणारेच लंपास करतायत किंवा पकडणारे थोडे लंपास करून उरलेलेच सापडले असं सांगतायत. कोणी सांगेल का मला”
गेल्या काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजन अभिनेता आणि होस्ट संकर्षण कऱ्हाडे यानेही राजकीय कविता केली होती. त्याने केलेल्या कवितेची चाहत्यांमध्येही चांगलीच चर्चा झाली होती. अभिनेत्यानेही कविता दिवाळी पहाटेच्या एका कार्यक्रमात केली होती.
हे देखील वाचा- मतदान करा, ५० टक्के सूट मिळवा; ‘पाहिले न मी तुला’ नाटकाची खास ऑफर