Ajey The Untold Story Of A Yogi First Look Motion Poster Yogi Adityanath Biopic
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशाच्या राजकारणाली प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकनंतर आता योगी आदित्यनाथ यांच्यावर बायोपिक येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून योगी आदित्यनाथ यांच्या बायोपिकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु होती. आता अखेर त्या चर्चांवरून पडदा हटलेला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर बनवल्या जाणाऱ्या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर समोर आला आहे.
‘झी नाट्य गौरव’मध्ये दिवंगत अतुल परचुरेंच्या रुपात आला ‘हा’ अभिनेता, प्रेक्षकांना अश्रू अनावर
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं नाव ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ (Ajey – The Untold Story Of A Yogi) असं आहे. ह्या चित्रपटाचं कथानक शंतनू गुप्ता यांच्या ‘द मंक हू बिकेम चीफ मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाची आजच घोषणा करण्यात आली असून त्याचा पहिला लूकही आजच समोर आला आहे. ’12th फेल’ फेम अभिनेता अनंत जोशीने चित्रपटात योगी आदित्यनाथ यांची भूमिका साकारली आहे. अनंत जोशीचा जबरदस्त लूक टीझरमध्ये पाहायला मिळतोय. टीझरमध्ये परेश रावल आणि भोजपुरीतील प्रसिद्ध अभिनेता निरहूआ यांचा आवाज ऐकू येतोय.
योगी आदित्यनाथ यांचा जीवनप्रवास ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ‘महाराणी २’ वेबसीरीजचे दिग्दर्शक रवींद्र गौतम यांनी केले आहे. अनंत जोशी व्यतिरिक्त, दिनेश लाल यादव, अजय मेंगी, राजेश खट्टर, गरिमा विक्रांत सिंह आणि सरवर आहुजा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ हे ‘महाराणी २’ मालिकेचे दिग्दर्शक रवींद्र गौतम यांनी दिग्दर्शित केले आहे. अनंत जोशी व्यतिरिक्त, दिनेश लाल यादव, अजय मेंगी, राजेश खट्टर, गरिमा विक्रांत सिंह आणि सरवर आहुजा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
प्रतीकने हटवलं वडील राज बब्बर यांचं नाव; सावत्र भाऊ आर्य म्हणाला, “स्मिता मां आमची…”
चित्रपटाचे नाव योगी आदित्यनाथ यांच्या जन्म नाव अजय सिंह बिष्टवरून प्रेरित आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक रवींद्र गौतम यांनी सांगितले की, “हा चित्रपट देशातील लाखो तरुणांना प्रेरित करेल, याची मला शाश्वती आहे. उत्तराखंडमधील एका दुर्गम गावात राहणाऱ्या एका मुलाची विलक्षण कहाणी लोकांसमोर या चित्रपटाच्या माध्यमातून येणार आहे. सध्या भारतातील सर्वाधिक लोकसंख्या राज्याचे ते मुख्यमंत्रि पद ते भूषवत आहेत.” योगी आदित्यनाथ २०१७ पासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.