उर्फी जावेदचा साखरपुडा : उर्फी जावेद नेहमीच्या तिच्या फॅशनमुळे आणि तिच्या खासगी जीवनामुळे चर्चेत असते. उर्फी जावेदची वेगळी अशी ओळख सांगायची गरज नाही. उर्फी नेहमीचं अतरंगी फॅशन करून मीडियासमोर येत असते. उर्फीला टेलिव्हिजनवरचा लोकप्रिय शो बिगबॉस मधून प्रसिद्धी मिळाली. उर्फीच्या फॅशनमुळे तिच्यावर बऱ्याच वेळा टीका सुद्धा झाली आहे. फक्त जनतेनेच नाही तर राजकीय महिलांनी सुद्धा तिच्यावर टीका केली आहे. उर्फी नेहमीचं तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते.
आता मात्र उर्फी जावेद एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फीनं गुपचूप साखरपुडा केल्याच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. उर्फीनं गुपचूप साखरपुडा केला असे फक्त म्हंटले जात नाही तर त्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यावेळी उर्फीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंमुळे ती पुन्हा चर्चेत आली. या फोटोत उर्फी जावेद एका मिस्ट्री मॅनसोबत पूजा करताना दिसतेय. त्यामुळे आता उर्फीचा रोका झाल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप उर्फीने याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये उर्फी एका उर्फीसोबत बसलेली दिसतेय. या फोटोमध्ये दोघेही सोबत बसले असून हवन कुंडही फोटोत दिसत आहे. हे फोटो समोर आल्यानंतर नेटकरी आता या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. उर्फी जावेदच्या लुकनेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. ती काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. तिने कपाळावर गंध लावलेला दिसत आहे. या फोटोमध्ये उर्फी जावेद मुलाला अंगठी देताना दिसतेय. मात्र तो मुलगा कोण आहे याबाबत अद्याप माहीती समोर आलेली नाही. त्याचा चेहरा फोटोत स्पष्ट दिसत नाही. मात्र हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही हैराण झाले आहेत.






