यामी गौतम आणि आदित्य धर (Yami Gautam and Aditya Dhar) हे बॉलिवूडच्या लाडक्या जोडप्यांपैकी एक आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला या जोडप्याने आईवडील होणार असल्याचं सांगितलं होतं. आता, नुकतंच या जोडप्याने त्यांच्या चाहत्यांसोबत आंनदाची बातमी शेअर केली आहे. त्यांच्या घरी त्यांच्या मुलाचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांच्या मुलाचं नावही सांगितलं आहे.
[read_also content=”मोडका हात घेऊन ऐश्वर्यानं कान्समध्ये लावली हजेरी, आता होणार शस्त्रक्रिया https://www.navarashtra.com/movies/aishwarya-rai-came-banck-to-india-after-attending-cannes-film-festival-now-her-surgery-will-be-done-nrps-535500.html”]
यामी गौतम आणि आदित्य धर बनले आईवडील
यामी गौतम आणि आदित्य धरने 4 जून 2021 विवाह बंधनात अडकले. अत्यंत साध्या पद्धतीने या कपलने कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यानतंर या वर्षाच्या सुरुवातीला यामीने ती आई होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज 20 मे रोजी त्यांच्या घरी लहानग्याचं आगमन झालंय. यामी आणि आदित्य पालक झाले असून त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली. त्यासोबतच त्यांनी त्यांच्या मुलाचं नावं वेदवीद ठेवल्याचंही सांगितलं.
काय म्हणाली यामी
“आम्ही पालकत्वाच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करत असताना, आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची आम्ही अपेक्षा करतोय. त्याने गाठलेल्या प्रत्येक मैलाचा दगड, तो आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी तसेच आपल्या प्रिय राष्ट्रासाठी अभिमानाचा दीपस्तंभ बनेल या आशेने आणि विश्वासाने आम्ही भरलेले आहोत,” .
यामी आणि आदित्यने त्यांच्या मुलाचं नाव वेदवीद (Vedvid) ठेवलं आहे. हे नाव अतिशय वेगळं आहे. हिंदू धर्मात या नावाचा महत्त्वाचा अर्थ आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, वेदविद म्हणजे वेदांमध्ये पारंगत असलेली व्यक्ती. भगवान विष्णूचंही हे एक नावं आहे.
Web Title: Yami gautam and aditya dhar blessed with baby boy nrps