भारतात मासे खाणाऱ्यांची संख्या खूप आहे. अनेक लोकांना मासे खाणे खूप आवडते. माशांचे दोन प्रकार असतात. गोड्या पाण्यातील माशांच्या प्रकाराला पश्चिम बंगाल तसेच ओडिशा राज्यांमध्ये खूप खाल्ले जाते. तसेच खाऱ्या पाण्यातील माशांच्या प्रकाराला भारताच्या पश्चिम भागामध्ये जास्त मागणी आहे. माशांमधील कोळंबी हा प्रकार अनेकांना आवडतो. कोळंबी खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊ.
कोळंबी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. (फोटो सौजन्य: Social Media)

कोळंबीमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड असते. याच्या सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

कोळंबीमध्ये असणारे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असतात. कोळंबीच्या सेवनाने हाडांची वाढ होते आणि हाडे मजबूत राहतात.

कोळंबीमध्ये व्हिटॅमिन B12 मोठ्या प्रमाणात आढळतात. व्हिटॅमिन B12 नर्व्ह सिस्टीमच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहे. कोळंबीच्या सेवनाने नर्व्हस फंक्शन सामान्य आणि आरोग्यदायी राहते.

कोळंबी या माश्यात झिंक तसेच सेलेनियमचे प्रमाण जास्त असते, ज्याचे सेवन शरीराच्या प्रतिकारशक्तीच्या वाढीला कारणीभूत ठरतात.

कोळंबीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन B12 आणि फोलेटमुळे लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढते. याच्या सेवनाने शरीरातील ऑक्सिजन वाढते तसेच शरीर ऍनिमियासारख्या आजारापासून चार हात लांब राहतो.






