खवीस दिसलं की माणूस मारतो आणि मुंज्या दिसला की माणसाचा लग्न होत नाही. पण 'गिऱ्हा' हा तसा जरा Chill प्रकार आहे. याचे वास्तव्य पाणवठ्याच्या ठिकाणी किंवा पाण्यातच असते. अनेकदा आपण कथा आणि गोष्टी ऐकल्या असतील की 'कुणीतरी नदीवर किंवा डॅमवर पोहण्यासाठी गेले आणि त्यांना कुणीतरी आत पाण्यात खेचण्याचा भास झाला.' मुळात, हा भास नसतो. हा गिऱ्हा असतो, असे बहुतेक लोकांचे म्हणणे आहे.
गिऱ्हा 'या' भुताच्या प्रकाराविषयी जाणून घ्या. (फोटो सौजन्य - Social Media)
कोकणात अशा अनेक भुताटकीच्या कथा प्रसिद्ध आहेत. त्यातील प्रसिद्ध असे भूत म्हणजे 'गिऱ्हा'. भूत आहे तर भयानक तर असणारच पण इतरांपेक्षा जरा कमी.
पाण्यामध्ये हा भूत वास्तव्य करतो. पाण्यामध्ये याचेच साम्राज्य म्हंटले तरी चुकीचे नाही. रात्रीच्या वेळी पाण्यात कुणी आले तर ते 'गिऱ्हा' घरी गेले.
फक्त पाण्यात नाही तर गिऱ्हा स्मशानातही वास्तव्य करतो. मुळात, स्मशान हे पाणवठ्याच्या शेजारीच असते. स्मशानात गिऱ्हाच नाही तर जखीण, हडळ जवळजवळ सगळी गँगच राहत असते.
गिऱ्हाचे केस कुणाला सापडले तर तो व्यक्ती गिऱ्हाकडून हवे ते मागू शकतो आणि गिऱ्हा त्या सगळ्या गोष्टी त्याला पुरवतो.
पण अशा वेळी गिऱ्हा ते केस मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करतो आणि समजा ते त्याला सापडले तर त्या व्यक्तीची काही खैर नाही. जितके गिऱ्हाने दिले असते त्याच्या दहापटीने तो वसूल करतो.