आयपीएलचा नवा सीजन सुरू झाला आहे आणि काही दिवसांपूर्वीच तीन सामन्यांच्या आकडेवारी समोर आली होती यावेळी दर्शक संख्येचे रेकॉर्ड अनेक वर्षांपूर्वींचे मोडले गेले आहेत. त्याचबरोबर भारताच्या संघाने नुकतीच आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे त्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटची चर्चा होत आहे. आता एक्सवर सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची यादीसमोर आली आहे. यामध्ये टॉप पाच व्यक्तिमत्त्वांच्या यादीमध्ये भारताचे तीन खेळाडू आहेत यामध्ये कोणकोणत्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे या संदर्भात संपूर्ण यादी वाचा.
जगात सर्वाधिक चर्चेत असलेल्या भारतीय व्यक्तिमत्वाची नावे
एक्सवर सर्वाधिक चर्चेत असलेल्या टॉप पाचच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अव्वल स्थानावर आहे. महेंद्रसिंग धोनीची फॅन्स फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये आहेत. त्याला लोक पाहण्यासाठी त्याचबरोबर मैदानात खेळताना पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात त्याने आंतरराष्ट्रीय निवृत्ती घेतल्यानंतर बऱ्याच काळापासून तो आयपीएल खेळताना दिसत आहे. फोटो सौजन्य - Chennai Super Kings सोशल मीडिया
या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली आहे. विराट कोहली हा भारतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व फक्त भारतातील लोकच त्याला पसंत करत नाहीत तर जगभरामध्ये त्याला पसंत केले जाते त्याचबरोबर त्याने अनेक क्रिकेटमध्ये रेकॉर्ड त्याच्या नावावर केले आहेत. फोटो सौजन्य - RCB सोशल मीडिया
प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच त्यांच्या कामासाठी ओळखले जातात त्याचबरोबर ते नेहमीच त्यांच्या वक्तव्याने त्याचबरोबर त्यांच्या कामामुळे चर्चेत राहिले आहेत. फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
सर्वाधिक चर्चेत असलेल्या भारतीय व्यक्तिमत्त्वांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आहे. भारताच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात मागील नऊ महिन्यांमध्ये दोन आयसीसी ट्रॉफी नावावर केल्या आहेत. २०२४ मध्ये झालेल्या T२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारताच्या संघाने दुबईमध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा एकही सामना न गमावता विजय मिळवला होता. फोटो सौजन्य - Mumbai indians सोशल मीडिया
या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आंध्र प्रदेशचे पर्यावरण वन, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री पवन कल्याण हे पाचव्या स्थानावर आहेत. फोटो सौजन्य - X सोशल मीडिया