वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम जसा आरोग्यावर दिसून येतो तसाच परिणाम त्वचा आणि ओठांच्या आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरासोबतच ओठांच्या त्वचेची सुद्धा जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. ओठ कोरडे होण्यामागे अनेक कारण आहेत. पाण्याची कमतरता, सतत लिपस्टिक लावणे किंवा आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम ओठांवर दिसून येतो. आज आम्ही तुम्हाला कोरड्या ओठांवर कोणतेही स्किन केअर प्रॉडक्ट लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील कोणते पदार्थ लावावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे तुमचे ओठ पुन्हा एकदा गुलाबी होतील. (फोटो सौजन्य – istock)
हवामानातील बदलांमुळे कोरडे झालेले ओठ सुधारण्यासाठी स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर
कोरड्या आणि निर्जीव ओठांपासून सुटका मिळवण्यासाठी मध आणि लिंबाच्या रसाचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये लिंबाचा रस आणि मध मिक्स करून ओठांवर लावा. त्यानंतर काहीवेळ हलक्या हाताने मसाज करून ओठ पाण्याने धुवून घ्या.
ओठ मऊ करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करावा. अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये असलेले गुणधर्म ओठ हायड्रेट करण्यासाठी मदत करतात. अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिक्स करून कापसाच्या मदतीने ओठांवर लावून नंतर पाण्याने धुवून घ्या.
ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी बीटरूटचा वापर करावा. बीटरूटमध्ये असलेले गुणधर्म ओठ हायड्रेट ठेवतात. बीटचा रस ओठांवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ करून घ्या.
रात्री झोपण्याआधी ओठांवर बदाम तेल लावावे. बदाम तेलात असलेले गुणधर्म ओठ कायमच हायड्रेट आणि मुलायम ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे बदाम तेलाचा वापर करावा.
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले तूप ओठांवरील पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी मदत करतात. नियमित रात्री झोपण्याआधी ओठांवर तूप लावावे. यामुळे ओठ काही दिवसांमध्ये मऊ होतील.