उन्हाळ्यात अतिशय आवडीने खाल्लला जाणारा पदार्थ म्हणजे दही. शरीरात वाढलेली उष्णता, पोटात वाढलेली जळजळ आणि पचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी दही किंवा ताक पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. यामध्ये असलेली पोषक घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. दह्यामध्ये शरीराला शीतलता देणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीर आतून हायड्रेट आणि थंड राहते. दह्यामध्ये असलेले गुणकारी घटक आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीया वाढवतात आणि आरोग्य सुधारतात. चला तर जाणून घेऊया उन्हाळ्यात दही खाण्याचा सल्ला का दिला जातो आणि दही खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दही खाण्याचा सल्ला का दिला जातो? जाणून घ्या दही खाण्याची योग्य पद्धत आणि शरीराला होणारे फायदे

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी वाटीभर दही खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो. यामुळे पोटात थंडावा टिकून राहतो.

शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी दह्याचे सेवन करावे. दह्यासोबतच ताक, लस्सी किंवा इतर पदार्थांचा सुद्धा आहारात तुम्ही समावेश करू शकता.

दही कायमच दुपारच्या जेवणानंतर खावे. संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री दह्याचे सेवन अजिबात करू नये. यामुळे पोटासंबंधित समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू शकतात.

ज्या लोकांना वारंवार सर्दी, खोकला किंवा घसादुखीचा त्रास होत असेल अशांनी दह्याचे सेवन अजिबात करू नये. यामुळे त्यांचा त्रास आणखीनच वाढू शकतो.

खूप जास्त आंबट दही खाऊ नये. यामुळे छातीत जळजळ किंवा आम्लपित्त वाढू शकते. दह्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर किंवा काळे मीठ एकत्र करून खावे.






