महाराष्ट्रातील शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचे केल्याने अबु आझमी यांनी नाराजी व्यक्त केली (फोटो - सोशल मीडिया)
Vande Mataram in school: मुंबई: राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमवरुन वाद निर्माण झाला आहे. वंदे मातरम् या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम पूर्ण स्वरूपात म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन मात्र आता वाद निर्माण झाला आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गाण्याचे आत्तापर्यंत केवळ दोन कडवे गायली जात होती. मात्र यापुढे पूर्ण गीत म्हणण्याचे महाराष्ट्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. याला मात्र समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी विरोध दर्शवला. यावरुन राजकीय वाद निर्माण झाला आहे.
३१ ऑक्टोबर २०२५ (कार्तिक शुद्धी नवमी) रोजी या गाण्याच्या रचनेला 150 वर्षे पूर्ण होतील. यानिमित्ताने सर्व शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम गाण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतवा आहे. मात्र यावर समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी मुद्यावरून आक्षेप घेतला आहे. “वंदे मातरम बंधनकारक करणं योग्य नाही” असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी घेतलेल्या या या भूमिकेनंतर भाजप नेत्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. मंगलप्रभात लोढा तसेच नवनाथ बन यांनी आझमींवर जोरदार निशाणा साधला आहे. भारत माता, आणि वंदे भारतची ॲलर्जी असेल तर त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन राहावे, अबू अजमी यांनी देश सोडून जावेव,पाकिस्तानात जावं अशी जहरी टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तर अबू आझमींवर टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, “अबू आझमींना कळलं पाहिजे हा पाकिस्तान नाही, तर भारत आहे . नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा भारत आहे, देवेंद्रजींचा महाराष्ट्र आहे. भारत मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
अबू आझमी यांच्या मतदारसंघातील लोकांना आवाहन आहे त्यांच्या घरी जा आणि वंदे मातरम दिन आमच्यासोबत साजरा करा. वंदे मातरम स्वतंत्र्याचे गीत होते, मंत्र होता, आज पण याचे उच्चारण होते. या गीताला 150 वर्षं पूर्ण होत आहेत, त्याच पार्श्वभूमीवर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठा कार्यक्रम साजरा करणार आहोत. कोणाची हिंमत असेल तर समोर यावं, नाहीतर आमचे कार्यकर्ते तुमच्या घरासमोर येत वंदे मातरमचे गायन करतील असा इशाराही मंगलप्रभात लोढा यांनी अबू आझमी यांना दिला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या वादावर भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भारतात राहयचं असेल तर वंदे मातरम्, भारत माता की जय म्हणाव लागेल. भारत माता, आणि वंदे भारतची ॲलर्जी असेल तर त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन राहावे.वेदांपेक्षा आम्हाल वंदे मातरम् प्रिय आहे. अबू अजमी यांना द्वेष असेल तर त्यांनी देश सोडून जावा, अशा शब्दांत अबू आझमी यांच्यावर भाजप नेत्यांनी निशाणा साधला आहे.






