नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीमुळे खासदार अशोक चव्हाण यांनी मोठी आश्वासने दिली (फोटो - सोशल मीडिया)
Nanded Political News : नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या (Maharashtra Local Body Elections) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, नांदेड (Nanded News) महानगरच्या वतीने कुसुम सभागृहात कार्यकर्त्यांची संवाद बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी शहरातील गुंडगिरी मोडून काढू, वाहतूक कोंडी सोडविण्याचे आश्वासन दिले आहेत. पालिका निवडणुकीच्या दृष्टीने आश्वासनांची खैरात वाटली जात असून नागरिकांना मतदानाचे कळकळीचे आवाहन केले जात आहे.
बैठकीला खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजप संघटन मंत्री संजय कौडगे, माजी मंत्री डी. पी. सावंत, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष (दक्षिण) संतुक हंबर्डे, जिल्हाध्यक्ष (उत्तर) अड. किशोर देशमुख, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. अंकुश देवसरकर, चैतन्यबापू देशमुख, भाऊराव कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, उद्योजक मारोतराव कवळे, डॉ. सचिन उमरेकर, मनोज भंडारी, संतोष पांडागळे, शीतल खांडील, राज यादव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे देखील वाचा : अजित पवारांनी ओवैसींना झापले! हिजाबच्या राजकारणावरून ओवैसींवर निशाणा, म्हणाले – “फालतू विधानांपेक्षा…..”
विविध विषयांवर चर्चा
डीपी प्लॅन रद्द झाल्यामुळे शहराचा विकास रखडल्याचा आरोप करत एमआयडीसी विस्तार, उद्योगांसाठी जागा, नादेड-दुग्णनूर परिसराचा विकास, तसेच रेल्वे, रस्ते व विमानसेवेमुळे मिळालेली कनेक्टिव्हिटी भविष्यातील उद्योगांसाठी फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले, विष्णुपुरी येथील कॅन्सर हॉस्पिटल, न्यायालयीन इमारतीसाठी ५०० कोटींचा निधी आणि २०० एकर विकासासाठीची जमीन याचाही त्यांनी उल्लेख केला. खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी शहरातील गुंड प्रवृतीचे नेटवर्क उद्धवस्त करू, व्यापारी व बांधकाम व्यावसायिकावरील खंडणी थांबवू, तसेव भाजप सत्तेत येताच संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवण्याची घोषणा केली.
गोदावरी घाटाचे सुशोभीकरण, होली सिटी संकल्पना, धूळमुक्त प्रदूषणमुक्त व नशामुक्त नांदेडचे ध्येय त्यांनी मांडले, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. अंकुश देवसरकर यांनी जो बोलती ती करून दाखवतो ही अशोक चव्हाण यांची ओळख असल्याचे सांगत भाजपच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला, यावेळी हर्षद शहा, डॉ. मनीष देशपांडे, डॉ. संजय कदम, दीपक कोठारी, जयप्रकाश भराडिया, अड. आशीष गोदमगावकर, राजेंद्र हुरणे, रवी कडगे आणि डॉ. बंग यांनीही आपली मते मांडली.
हे देखील वाचा : राज ठाकरे झीरोंचे हिरो, ठाकरे आणि ओवैसी एकाच विचाराचे औलादी; गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं
नागरिकांना सुरक्षित वातावरण देणार
यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी शहरातील गुंडगिरी, माफियागिरी आणि वाहतूक कोंडीवर स्पष्ट भूमिका मांडली, “नांदेड शहरात बोटे तोडणे, डोके फोडणे असे प्रकार चिंताजनक आहेत. आगामी काळात शहरातील गुंडगिरी मोडून काढणार असून नागरिकांना सुरक्षित वातावरण देणार,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सराफा बाजार व इतवारा परिसरात त्यांच्या कार्यकाळात रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडी दूर झाल्याचे उदाहरण देत, सध्या रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणामुळे समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या विकासासाठी दिलेल्या वचनाचा उल्लेख करत भाजपचा जाहीरनामा ही विकासाची ठोस कमिटमेंट असल्याचे चव्हाण म्हणाले, इंदौरसारख्या स्वच्छ शहराच्या धर्तीवर नांदेड स्वच्छ व सुव्यवस्थित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.






