मलकापुरात आणखी एक जागा बिनविरोध; दुसऱ्या जागेसाठी भाजप-राष्ट्रवादीत लढत (फोटो - iStock)
कराड : मलकापूर पालिकेच्या दोन जागांच्या निवडणुका तांत्रिक कारणांमुळे पुढे गेल्या होत्या. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार बुधवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपूर्वीच एक जागा बिनविरोध झाली. तर दुसऱ्या जागेसाठी भाजप व राष्ट्रवादीमध्ये सरळ लढत होणार असून, २० डिसेंबरला मतदान प्रक्रिया घेतली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर दाखल झालेल्या अपिलांवर जिल्हा न्यायालयाने २२ नोव्हेंबरपर्यंत निकाल देणे अपेक्षित होते. मात्र, काही ठिकाणी हे निकाल २३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर लागले आहेत. परंतु नियमांनुसार उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी मिळणे अपेक्षित होते, तो मिळाला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आयोगाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देत सुधारीत वेळापत्रक जारी केले होते.
हेदेखील वाचा : महानगरपालिकांसह जिल्हा परिषदांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? बावनकुळेंनी केलं मोठं विधान; म्हणाले…
दरम्यान, या सुधारित वेळापत्रकानुसार मलकापुरातील दोन प्रभागातील जागांची निवडणूक लांबणीवर पडली होती. त्यामध्ये प्रभाग आठ अ मध्ये स्वाती तुपे व गीता साठे या दोघींनीही भाजपकडून अर्ज दाखल केला होता. पक्षाने ए.बी. फॉर्म दिला होता. त्या फॉर्ममध्ये तुपे अधिकृत उमेदवार तर साठे पर्याय उमेदवार होत्या.
अर्ज छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी साठे यांचा अर्ज अपात्र ठरवला होता. मात्र, साठे यांनी याबाबत जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने साठे यांचा अर्ज पात्र ठरवला होता. त्यांचा अर्ज पात्र ठरल्यानंतर भाजपच्या दुसऱ्या उमेदवार तुपे यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून गीता साठे यांचा अर्ज निश्चित झाला आहे.
राष्ट्रवादीच्या छाया भोसले या निवडणूक रिंगणात
या जागेसाठी राष्ट्रवादीच्या छाया भोसले या निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या जागेसाठी भाजपा व राष्ट्रवादी अजित पवार गटातमध्ये सरळ लढत होणार आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार या जागेची निवडणूक २० डिसेंबरला होणार असून, नगराध्यक्षपदासह भांडण नगरसेवकपदाच्या जागांचा निकाल एकत्रित 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
हेदेखील वाचा : मुंबईत अनेक कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश; संघटनेला मिळाली नवी ताकद






