उत्तर सोलापूर मध्ये बळीराम साठे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला (फोटो - टीम नवराष्ट्)
Maharashtra Politics : उत्तर सोलापूर : अवघ्या एकाच दिवसात नियोजन करुन तीन हजार लोकांचा जनसमुहाय जमवून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे, वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे, जयदीप साठे या साठे पिता-पुत्र नातवासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते साठे पिता पुत्रांनी घड्याळाचे उपरणे परिधान करुन गुरुवारी (दि.27 ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.
दरम्यान नगरपरिषदांच्या निवडणूक काळात प्रचार सभांशिवाय अन्य कार्यक्रम घ्यायचा नाही, असे ठरविले.मात्र, काका साठे यांच्यासारखी माणसं मिळण, हे भाग्यच असल्याचे सांगून खास त्यांच्या प्रवेशासाठी वडाळा गावात आलो असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार यांनी काका साठे यांच्या साठ वर्षांच्या निष्ठेच्या आणि विकासाच्या राजकारणाचे कौतुक करुन त्यांच्या कौतुकाचा पाढाच वाचला. उत्तर सोलापूर तालुक्याच्या विकासासाठी मी भक्कमपणे पाठिशी असल्याची ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली. वडाळा येथील विठ्ठल मंगल कार्यालयात बळीराम साठे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा खास कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी अजित पवार म्हणाले, सत्ता ही उपभोगण्यासाठी नाही तर जनता जनार्धनाच्या सेवेसाठी आहे. साठे यांनी सत्तेची भाकरी कधीच करपू दिली नाही. साठ वर्षे त्यांनी पवार साहेबांवर त्यांनी निष्ठा जपली. महिला आरक्षण असो व विकास आम्ही पवार साहेबांची परंपरा पुढे चालू ठेवली आहे. मी कामाचा माणूस आहे. हेलपाटेवारी मला चालत नाही. सोलापूर जिल्हा बँकेची स्थिती कोणामुळे झाली. पुणे जिल्हा बँकेत 35 वर्षांपासून आमची सत्ता असून राज्यात पहिला, दुस-या क्रमांकावर आम्ही असतो.
अंजली दमानिया आणि अजित पवारांमध्ये पेटलं वाकयुद्ध? पुणे जमीन घोटाळा थेट जाणार हायकोर्टात
आमदार खरे म्हणाले की, चार हजार कोटी रुपये विकास कामासाठी देऊनही त्यांची भूक भागली नाही. आता आठ हजार कोटी रुपयांच्या लालसेने त्यांनी तुमची साथ सोडली आहे. मी तुमच्या सोबत आहे. आगे आगे देखो क्या होता है! मतदारसंघाच्या विकासासाठी निधी द्या,असे ते म्हणाले. त्याचबरोब काका साठे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या विभाजनाच्या मला अजित पवारांनी बोलाविले होते. पण मला शरद पवारांना सोडायचे नव्हते. त्यांच्या परस्पर पक्षात काहीही चालले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मला अजित पवारांसोबत जावे लागले मात्र, अजित पवार शेवटपर्यंत तुमच्या पक्षात एकनिष्ठ राहून जिल्हाभर पक्षाचे काम वाढवितो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले, गेली साठ वर्षांपासून पवार साहेबांवर निष्ठा ठेवून विकासासाठी राजकारण केलेल्या काका साठे यांनी पवार कुटुंबाच्या विचाराशी फारकत घ्यायची नाही, या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
बंद दाराआड सापडल्या पैशांनी खचाखच भरलेल्या बॅगा; निलेश राणेंनी भाजप नेत्याच्या घरी टाकली धाड
कायदा हातात घेऊन कुणाचंही भल होत नाही. कधी ना कधी फुगा फुटतो. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात, असे सांगून अप्रत्यक्षरित्या राजन पाटील यांना अजित पवारांनी टोला मारला. माझ्या शरिराच्या वजनावरुन लोक नावे ठेवू लागले म्हणून सर्जरी करुन वजन कमी केले. आता विकासासाठी निधी आणत नाही म्हणून नावे ठेवत आहेत, असे म्हणताच अजित पवार म्हणाले, शरिराचे वजन कमी करायचे तुम्ही बघा, जनमाणसातील वजन वाढवायचे मी बघतो.
थोडी कळ काढा
काका साठे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घ्या, अशी मागणी रानमसले ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ हावळे यांनी केली. तेव्हा अजित पवार म्हणाले, काका आता तरी पक्षात आलेत बघू ना….पण तुम्ही थोडी कळ काढा
संतांच्या विचारांचा वारसा काकांनी जपला आता जयदीप काकांचा वारसा तुला जपायचा आहे, असा कानमंत्रही अजित पवारांनी जयदीप साठे यांना उघडपणे दिला.






