2034 पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री : बावनकुळे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यासह देशभरामध्ये होळीचा आणि धुलवडचा सण साजरा केला जात आहे. राजकीय वर्तुळामध्ये देखील टीकांचा धुराळा उडाला आहे. नेत्यांनी एकमेकांना होळीच्या निमित्ताने कोपरखळ्या दिल्या असून राजकीय चिमटे काढले आहेत. यामध्ये आता भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. तर संजय राऊतांनी देखील जोरदार पलटवार केला आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली. होळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी टोला देखील लगावला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी दररोज सभागृहात यावं तर संजय राऊतांनी त्यांचा सकाळचा शिमगा वर्षभरासाठी बंद करावा”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोपरखळी लगावली आहे, असा टोला बावनकुळेंनी लगावला. तसेच नाना पटोलेंवर देखील निशाणा साधला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप नेते बावनकुळे म्हणाले की, “संजय राऊत यांना माझ्या शुभेच्छा आहेत की ते दररोज सकाळी ९ वाजता जे खोचक टोले लगावतात. त्यांचा तो दररोजचा शिमगा त्यांनी वर्षभरासाठी बंद करावा आणि महाराष्ट्रातील सरकारला विकासासाठी सूचना द्याव्यात. दररोज सकाळी बोलावं पण राज्य कशाप्रकारे पुढे जाईल यासाठी बोलावं. नाना पटोले यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांना विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने दिलेला आहे. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आणि पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त सरकार चालण्यासाठी होळीच्या निमित्ताने नाना पटोलेंनी संकल्प करावा अशा माझ्या त्यांना शुभेच्छा”, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, बावनकुळे यांंनीही करावा शिमगा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विषयी मत व्यक्त करण्या इतके ते महान नाही आहेत. शिमगा आमचा सण आहे त्यांना माहित नसेल तर मी सांगतो ते हिंदुत्ववादी आहेत ना. तुम्ही आमच्या गणेशोत्सव बंधन टाकत आहात पीओपी मूर्ती वरती देखील बंधन टाकत आहात होळी वरती देखील बंधन टाकत आहात मग शिमग्यावरती देखील बॅन करून टाका, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.