फडणवीस सरकारकडून 6 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपूरच्या अतिरिक्त आयुक्तांचं प्रमोशन
Nagpur News- नागपूर : औरंगजेबाची कबर काढून टाकण्यावरुन राज्यभरामध्ये मागील आठवड्याभरापासून राजकारण सुरु आहे. मात्र आता या मुद्द्यांवरुन नागपूरमध्ये दंगल घडली आहे. काल (दि.17) रात्री नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये दोन जमावामध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली. यामुळे नागपूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणावर आता राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणावर व्हिडिओ शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ही घटना निषेधार्थ असून यावर लक्ष ठेवून असल्याचे देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नागपूरच्या महाल भागामध्ये जी घटना घडली आहे ती अतिशय अयोग्य आहे. अशा प्रकारे जमाव जमा होऊन दगडफेक होणं हे अत्यंत चुकीचं आहे,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
नागपूर दंगलीसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे. नागपूर शहर हे एकोप्याने राहणारे शहर आहे. त्यामुळे कोणीही शांतता भंग करु नये. मी स्वतः या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितले आहे की, जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतले जाईल. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी याठिकाणी शांतता ठेवावी,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आवाहन केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून नागपूरमध्ये सोमवारी रात्री उसळलेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात आली आहे. महाल परिसरात काल रात्री मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली होती. हिंसक जमावाने क्रेनसह अनेक वाहने पेटवून दिली, ज्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडांचा खच पडला होता. मंगळवारी सकाळी नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे दगड हटवून रस्ते साफ केले, तसेच जाळपोळीच्या खुणाही मिटवण्यात आल्या. नागपूरमधील जनजीवन लवकरात लवकर पूर्वपदावर येण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागांतील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या भागांमध्ये नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे तसेच पाच किंवा त्याहून अधिक जणांनी एकत्र न जमण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.