कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे त्यांचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहेत (फोटो - सोशल मीडिया)
Rahul Gandhi Birthday : नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांचा आज म्हणजेच गुरुवार, १९ जून रोजी त्यांचा वाढदिवस आहे. राहुल गांधी हे त्यांचा ५५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांसोबतच इतर लोकही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या राजकीय प्रवासावर आणि वैयक्तिक आयुष्यावर एक नजर टाकूया. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० रोजी नवी दिल्लीतील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये झाला. राहुल गांधी हे गांधी या राजकीय घराण्याचे वारसदार आहेत. मात्र देशाच्या अशा चर्चेत राहणाऱ्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या राहुल गांधी यांना एक वेळ अशी होती की त्यांची ओळख बदलून वास्तव्य करावे लागले.
राहुल गांधींचा राजकीय वारसा
राहुल गांधींच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचे पणजोबा, दिवंगत आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले आणि सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिले. त्यांची आजी इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. एवढेच नाही तर त्यांचे वडील राजीव गांधी हे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान राहिले आहेत. गांधी कुटुंबातून राजकीय वारसा लाभलेले राहुल गांधी ही गांधी परिवाराची चौथी पिढी आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील सेंट कोलंबस स्कूलमधून घेतले. यानंतर ते डेहराडूनच्या प्रतिष्ठित द दून स्कूलमध्ये गेले. राहुल गांधी यांनी फ्लोरिडा येथील रोलिन्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली, जे प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठाचा भाग आहे. यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमधून एम.फिल पदवी प्राप्त केली.
राहुल गांधी राऊल विंची का बनले?
ते वर्ष १९८३ होते. जेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. या काळात राहुल गांधींना घरीच अभ्यास करावा लागला. यानंतर, राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी, जे पंतप्रधान झाले होते, त्यांचीही हत्या झाली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधींना त्यांचे नाव बदलून उच्च शिक्षण पूर्ण करावे लागले. पदवी प्राप्त केल्यानंतर, राहुलने जवळजवळ तीन वर्षे लंडनमधील मॉनिटर ग्रुपमध्ये काम केले. ही कंपनी व्यवस्थापन गुरू मायकेल पोर्टर यांची सल्लागार फर्म होती. हा तो काळ होता जेव्हा राहुल गांधींच्या जीवालाही धोका असल्याचे मानले जात होते. म्हणूनच येथेही तो राउल विंची या नावाने काम करत असे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
२०१७ मध्ये बनले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष
राहुल गांधी यांनी २००४ मध्ये भारतीय राजकारणात प्रवेश केला. राहुल गांधी यांनी त्यांचे वडील, माजी पंतप्रधान आणि दिवंगत राजीव गांधी यांच्या संसदीय मतदारसंघ अमेठीमधून निवडणूक लढवली आणि प्रचंड विजय मिळवला. या निवडणुकीत राहुल एक लाखाहून अधिक मतांनी विजयी होऊन लोकसभेत पोहोचले. २०१७ मध्ये राहुल गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
यानंतर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्याकडून दारूण पराभव पत्करावा लागला आणि हा पराभव केवळ राहुल गांधींचाच नव्हता तर संपूर्ण देशात काँग्रेसची कामगिरी खराब होती. त्यानंतर, पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.