लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन नाराज असलेल्या संजय शिरसाट यांना अजित पवारांनी सल्ला दिला (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : महायुतीमध्ये लाडकी बहीण योजनेवरुन वाद निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नाही. तसेच सामाजिक न्याय विभागाचा निधी हा लाडकी बहीण योजनेला वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर आता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे दौरा केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून अनेक विषयांवर भाष्य केले आहे. अजित पवार म्हणाले की, “याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी स्टेटमेंट दिलं आहे ते तुम्ही ऐकलं नाही का? मुख्यमंत्री जे बोलतात ते अंतिम असतं. कारण नसताना काहीजण चुकीची चर्चा करत आहेत. आम्हीही प्रचंड बहुमताने निवडून आलेलो आहोत. कुठल्याच घटकांवर अन्याय आम्ही करणार नाही सगळ्यांना नाही दिला जाईल,” अशी भूमिका अजित पवारांनी व्यक्त केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर त्यांची नाराजी व्यक्त केली. यावरुन अजित पवारांनी स्पष्टच शब्दांत भूमिका मांडली आहे. अजित पवार म्हणाले की, “अर्थसंकल्पामध्ये सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाला आपण यंदा 39 ते 41 टक्के वाढ करून अधिक निधी दिला आहे. माझं मंत्र्यांना सांगणं आहे की कॅबिनेट बैठक असते इतर ठिकाणी बोलण्यापेक्षा त्या व्यासपीठावर येऊन आपलं मत मांडलं पाहिजे. तर समज गैरसमज होणार नाहीत. काही जण नाही चुकून बोलून जातात. जर कोणाची तक्रार करायची असेल तर आम्हा सगळ्यांसमोर करा म्हणजे आम्हाला पण कळेल. पण आम्ही एकोपाने कारभार करत आहोत. त्याच्यामध्ये कुठे भांड्याला भांड लागत असेल तर आपण त्यातून मार्ग काढू. पण कारण नसताना गैरसमज निर्माण करून समाजामध्ये कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांमध्ये पत्रकारांमध्ये या ही गोष्टीला वाव देऊ नये. संजय शिरसाट मंत्री नाही ते आमदार आहेत त्याबद्दल बोललो आहे. कोणीही चुकीचा वागला तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल बीड असुदे इतर ठिकाण असू दे कोणी चुकीचं वागलं तरी कारवाई होणार,” अशा शब्दांत अजित पवारांनी संजय शिरसाट यांच्या नाराजीवर प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघेही एकमेकांच्या पक्षांचे प्रमुख आहेत. इंजिन आणि मशाल यांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही आणि मी विचार करून काय उपयोग आहे. त्या त्या संदर्भातला निर्णय त्यांचे त्यांच्या पक्षाचे प्रमुख घेतील,” असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.