लोकल बॉडी इलेक्शन (फोटो - टीम नवराष्ट्र)
राष्ट्रवादी शरद पवार गटाची नाराजी; राजीनामा देण्याची तालुकाध्यक्षांची तयारी
बैठकांवर बैठका सुरू; बहुतांश यादीची शक्यता
अद्याप कोणतेच ठोस निर्णय झालेले नाहीत
गुहागर: गुहागर नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीमधील भाजपा अधिक अग्रेसर राहिली आहे. आठ जागांबरोबर नगराध्यक्षपदही आपल्यालाच हवे असे म्हणून महायुतीमध्ये बिनसलेलेच पहावयास मिळत आहे. तर महाविकास आघाडीत उबाठा शिवसेना एकमेव प्राबल्य असल्याने मनसेला दोन जागा देत लढत देणार आहे.
शरद पवार गट राष्ट्रीवादीने आपल्या पक्षश्रेष्ठींबरोबर आघाडीतील नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली असून आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांनी व्यक्त केली. यामुळे निवडणुकीत आपला उमेदवारच उभा न करण्याचा पवित्रा घेतल्याने पाठिंब्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महाविकास आघाडीत बिघाडी दिसून येत आहे.
खेडमधून फिरवली जाताहेत राष्ट्रवादीची चक्रे
गतवेळची कुणबी समाज फॅक्टरएवजी शिवसेना शिंदे गट अग्रेसर आहे. यामुळे शिवसेनेचे विधानसभेच उमेदवार राहिलेले राजेश बैंडल नगर पंचायतीवरील शिवसेनेकडील नगराध्यक्षपद सोडावयास तयार नाहीत. तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांच्याबरोबर पदाधिकाऱ्यांनी आपल्या ९ जागा व नगराध्यक्षदावरुन असा दावा करत महायुतीची हाक दिली आहे.
Maharashtra Politics: “सत्ताधारी पक्षातील कुठल्याही…”; ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांचे मोठे विधान
बैठकांवर बैठका सुरू; बहुतांश यादीची शक्यता
अशात राष्ट्रवादीची चक्रे सध्या खेडमधून फिरवली जात असून महायुतीमधून राष्ट्रवाद अजित पवार गट कसा बाजूला राहील, याचे राजकीय डावपेच आखले जात आहेत परिणामी अजित पवार गट राष्ट्रवादीला २ शिवसेना शिंदे गट ९ व भाजपला ६ असे जागा वाटपाचे सूत्र महायुतीत तयार केले जात आहे असे असले तरी कोणत्या परिस्थितीत भाजपचा नगराध्यक्ष बसला पाहिजे, यासाठी जोर धरल जात आहे. गेली ७ वर्षे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर नगर पंचायतीकडे लक्षच दिलेल् नाही. यामुळे आता निवडणुकीत कोणते मुझे घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
अद्याप कोणतेच ठोस निर्णय झालेले नाहीत…
असे असले तरी महायुतीला जोरदार टक्कर देण्यासाठी उबाठा शिवसेनेच्याही बैठकांवर बैठका पार पाडल्या जात असून प्रत्येक उभे करण्यासाठी शोध अजूनही सुरूच ठेवला आहे. आज बहुतांशी यादी तयार होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्याही जोरदार बैठका सुरू आहेत. प्रभाग क्र.१ व क्र. १७ साठी राष्ट्रवादी आग्रही आहे. मात्र सुरु झालेल्या उमेदवारी अर्जाच्या तारखेला पहिला नंबर कोण लावतो,
याकडे लक्ष लागले आहे. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री उदय सामंत यांचे नियंत्रण तर भाजपावर नीलेश सुर्वे व माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे नियंत्रण आहे. दुसरीकडे आघाडीत बिघाडी झाल्याचे पहायला मिळत आहे. गुहागर विधानसभा असो की पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक असो, गुहागर तालुक्यात मजबुत असलेल्या राष्ट्रवादीला आघाडीत दुय्यम स्थान दिले जात आहे.






