केरळच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम! वेणुगोपाल, सतीशन की चेन्नीथला?
दरम्यानस मिळालेल्या माहितीनुसार, केरळ काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासंदर्भातील चर्चा तीव्र झाली आहे. केपीसीसी अध्यक्ष सनी जोसेफ यांनी रविवारी (१० मे, २०२६) सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लवकरच केरळच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने तीन प्रमुख दावेदारांशी आधीच चर्चा केली आहे.
PM Modi on Work From Home : नरेंद्र मोदींकडून ‘वर्क-फ्रॉम-होम’ चे आवाहन!काटकसर की संकटाची चाहूल?
नवी दिल्लीहून परतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सनी जोसेफ म्हणाले की, या विषयावर राज्यातील नेत्यांशी चर्चेची दुसरी फेरी घेण्याची गरज आहे असे त्यांना वाटत नाही. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केव्हा केली जाईल. याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. पण सर्व नेत्यांना कोणताही वाद किंवा कोणतेही आक्षेपार्ह विधाने टाळण्याचा सल्ला दिला आहे. संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) च्या मित्रपक्षांशी चर्चा होईल का, असे विचारले असता, काँग्रेस हायकमांड तो निर्णय घेईल,असं त्यांनी नमुद केलं.
पक्षातील सूत्रांनुसार, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांच्यातील चर्चा मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. सध्या, के. सी. वेणुगोपाल, व्ही. डी. सतीशन आणि रमेश चेन्नीथला हे मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक संभाव्य दावेदार मानले जात आहेत. या तिन्ही नेत्यांचे समर्थक आपापले दावे मजबूत असल्याचे मानतात. वेणुगोपाल यांच्या गटाला, काँग्रेस नेतृत्व विधिमंडळ पक्षाच्या मताला अधिक महत्त्व देईल, असा विश्वास आहे. तर त्यांची जनतेमधील लोकप्रियता आणि यूडीएफ मित्रपक्षांचा पाठिंबा यामुळे त्यांचा दावा अधिक मजबूत असल्याचे सतीशन यांच्या समर्थकांचे मत आहे.
रमेश चेन्नीथला हे देखील आपल्या उमेदवारीबद्दल खूप आशावादी असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या व्यापक राजकीय अनुभवाच्या आणि ज्येष्ठतेच्या आधारावर, पक्ष नेतृत्व त्यांना यावेळी संधी देईल अशी त्यांना आशा आहे. सूत्रांनुसार, व्ही. डी. सतीशन आणि रमेश चेन्नीथला दोघेही यावर समाधानी आहेत की, हायकमांडने त्यांना आपली मते सविस्तरपणे मांडण्याची पुरेशी संधी दिली. आता सगळ्यांच्या नजरा काँग्रेस नेतृत्वाच्या अंतिम निर्णयावर लागल्या आहेत.






