भगवान बाबा गडाचे महंतांनी धनंजय मुंडेंची बाजू घेतल्यामुळे मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
जालना : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. मागील दोन महिन्यापासून या प्रकरणामुळे अनेक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण उचलून धरले असून अनेक पुरावे सादर केले आहेत. मात्र भगवान गडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर पुन्हा टीका केली जात आहे. यावरुन आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भगवान गडाच्या महंतांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. महंतांनी धनंजय मुंडेंची बाजू घेतल्यामुळे मयत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबिय देखील आक्रमक झाले आहेत. पुराव्यांसह धनंजय देशमुख हे भगवान गडावर पोहचणार आहेत. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी महाराजांना जे बोलायचं होतं ते बोलून गेले जातिवादाचा नवीन अंक देऊन गेले, अशी सडकून टीका जरांगे पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
महंतांनी धनंजय मुंडेंना समर्थन दिल्यामुळे जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “नामदेव शास्त्री आरोपींच्या समर्थन करत आहे, संतोष देशमुख यांचा हत्या केली म्हणून आरोपींना आनंद वाटला असेल, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केली. धनंजय देशमुख आणि शास्त्री यांच्या भेटीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे कुटुंबाने जावो, महाराजांना जे बोलायचं होतं ते बोलून गेले जातिवादाचा नवीन अंक देऊन गेले. आम्ही तुमचा सन्मान करतो, पण आपण आपलं बघावं. दुसर्याकडे डोकवून पाहू नका, स्वत:ची चूक झाकण्यासाठी डिवचू नका, तुमच्याकडून चूक झाली आहे, एका समाजाला एका बाजूला नेण्याचं काम झालं आहे,” अशी सडकून टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे, तिथेही जातीवाद होऊ शकतो हा नवीन अंक राज्याला पाहायला मिळत आहे, अशी खरमरीत टीका मनोज जरांगे पाटील यांनी नामदेश शास्त्री यांच्यावर केली आहे. तुम्हाला आरोपींना मारलेली चापट दिसली. पण संतोष देशमुख यांचे रक्त दोन अडीच महिने कोणाला दिसले नाही. जातीय सलोखा बिघडला, पण धनंजय मुंडेच्या टोळीमुळे चौथा अंक पाहायला मिळाला, आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले, जातिवादाचा अंक भयंकर आहे, जातिवादाचा चौथा नवीन अंक राज्याला पाहायला मिळाला,” अशी गंभीर शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री व धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.