"उमेदवारांचा लेखाजोखा...", आमदार संग्राम जगताप यांचे मतदारांना 'हे' महत्वाचे आवाहन
आमदार जगताप म्हणाले की, शहरातील डी.पी. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. सध्या या रस्त्यांवर पथदिवे बसविण्याचे काम सुरू असून, लवकरच संपूर्ण परिसरात प्रकाशाचा लखलखाट दिसणार आहे. पुढील टप्प्यात शहरातील उर्वरित डी.पी. रस्त्यांची कामे मार्गी लावली जाणार असून, गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, कुष्ठधाम रोड आदी रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? ठाकरे बंधूंना भाजप सोबत घेणार? फडणवीस स्पष्टच म्हणाले…
“निवडणुका या केवळ आरोप-प्रत्यारोपांवर नव्हे, तर विकासाच्या व्हिजनवर लढल्या पाहिजेत. नगरसेवक असा असावा, जो पाच वर्षे नागरिकांना वेळ देईल आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेल. काही लोक शहरात खोट्या अफवा पसरवत आहेत. मात्र नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता घड्याळासमोरील बटण दाबून विकासाला साथ द्यावी,” असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार जगताप म्हणाले की, पूर्वी शहराची व्याप्ती केवळ हायवेपर्यंत मर्यादित होती. मात्र आता नागापूर गावठाण आणि पाईपलाईन हाडकोपर्यंत शहराचा विस्तार झाला आहे. 2018 च्या निवडणुकीत नागापूर गावठाण या प्रभागात समाविष्ट नव्हते. महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न 99 टक्के सुटला असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय भिस्तीबाग महाल परिसरात भव्य उद्यान विकसित करण्यात येणार असून, या भागाचे सुशोभीकरण केले जाईल. हे उद्यान अहिल्यानगर शहरातील सर्वात मोठे उद्यान असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
शहरातील पत्रकार चौक ते जिल्हा पोलीस अधीक्षक चौक रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, दुभाजकाचे काम सुरू आहे. तसेच दिल्ली गेट ते नेप्तीनाका रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले असून, तेथे पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्येही विविध रस्त्यांची कामे सुरू असून, गुलमोहर रस्ता, संत नामदेव चौक, भिस्तबाग चौक, एकविरा चौक या रस्त्यांचे काँक्रिटीकरण शासनाच्या माध्यमातून केले जाणार आहे.
तसेच तपोवन ते पाईपलाईन ते टेलिफोन एक्सचेंजपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण होत असून, तोफखाना पोलीस ठाणे ते भिस्तबागपर्यंतचा रस्ताही काँक्रिटीकरण करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच तपोवन रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असल्याचे सांगत आमदार जगताप म्हणाले, “आम्ही केवळ पदासाठी निवडणूक लढत नाही, तर विकासकामे पुढे नेण्यासाठी आणि जनतेसाठी वेळ देण्यासाठी निवडणूक लढत आहोत. 2018 मध्ये तपोवन रस्त्याच्या डांबरीकरणाचा संकल्प केला होता. येत्या पंचवार्षिक काळात या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्धार आहे. ज्या भागात विकास होतो, तेथेच लोकवस्ती वाढत जाते,” असेही त्यांनी नमूद केले.






