Santosh Deshmukh Case : '...हे तर गृहखात्याचं अपयश'; संजय राऊतांची टीका (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये सध्या दिशा सालियान मृत्यू प्रकरण चर्चेत आले आहे. सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. यावरुन आता ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा भाजपला जड पडला असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “औरंगजेबाच्या कबरीचा विषय या क्षणी निरर्थक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने औरंगजेबाच्या कबरीविषयी जी भूमिका घेतली, त्याकडे त्यांनी भाजपचे लक्ष वेधले आणि याप्रकरणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. तर कबर हटवण्यासंबंधी पत्र व्यवहार कसले करता?” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राऊत पुढे म्हणाले की, “कबर हटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांना पत्र लिहिले. मात्र फडणवीस यांना पत्र लिहिण्याची गरज नाही. राज्यात आणि केंद्रात त्यांचे सरकार आहे. त्यांचे पोलीस आहेत. बाबरी पाडताना त्यांनी कोणाची परवानगी घेतली नव्हती. देवेंद्र फडणवीस हे कार सेवा करण्यासाठी जाताना नागपूर रेल्वे स्टेशनवरचा फोटो आपण पाहिला. मग आता त्यांनी त्याच पद्धतीने वर्षा बंगल्यावरून बाहेर पडावं”, असा गंभीर सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वतः कबर फोडण्यासाठी जाण्याचा सल्ला दिला आहे. राऊत म्हणाले की, “वर्षा बंगल्यातून बाहेर पडावं. जय श्रीराम अथवा जय भवानी, जय शिवाजी असे वाक्य लिहिलेला रुमाल डोक्याला बांधावा. हातात कुदळ फावडे घ्यावे आणि त्यांचे जे पाच ते सहा वीर आहेत. ही पत्रबाजीची नाटकं बंद करा. राज्य तुमचं, कुदळ फावडं तुमचं, पोलीस तुमची, मग तुम्हाला कोणी आडवलं, जा आणि एकदाचा निर्णय करून या असा,” असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र हे पोलीस स्टेट झाले आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मारहाणीत मृत्यू झाल असून त्याचा अहवाल आला आहे. सूर्यवंशी यांची हत्या झाली. त्याला गृहमंत्री जबाबदार आहे. गृहमंत्री यापूर्वी काहीच झालं नाही म्हणत होतं. मग आता कारवाई कुणावर करणार. गृहमंत्री प्रायश्चित घेणार आहेत का,” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.