PM Kisan योजनेतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले..; यादीत तुमचे नाव असे चेक करा ?
PM Kisan sanman Nidhi Yojana: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याचे 2000 रुपये देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत. या हप्त्यासाठी एकूण 18,000 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पूरस्थितीमुळे यापूर्वी पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात 21 व्या हप्त्याची रक्कम आधीच पाठवण्यात आली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक सहाय्य मिळेल, जे त्यांच्या शेतीसाठी आणि जीवनव्यवस्थेसाठी उपयोगी ठरेल. पण त्याचवेळी महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना मात्र पीएम किसान योजनेच्या यादीतून वगळल्याची माहिती समोर आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवीन अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने आधार, प्राप्तिकर आणि शिधापत्रिका यादीतील माहितीच्या आधारे शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे.
Supreme Court: ‘नाहीतर निवडणुकाच रद्द करू…’; सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
येत्या तपासणीतून काही शेतकरी योजनेच्या निकषांमध्ये अपात्र ठरल्याने अडीच लाख शेतकऱ्यांची नावे 21 व्या हप्त्याच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. यामुळे महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, त्यांच्या नावाचा समावेश पीएम किसान योजनेच्या यादीत आहे की नाही. योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव कसे तपासायचे हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध ऑनलाइन सुविधा वापरून सहज पाहता येईल.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याचे 2000 रुपये महाराष्ट्रातील 90 लाख 41 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 19 नोव्हेंबर रोजी जमा होणार आहेत. केंद्र सरकारकडून दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये आर्थिक सहाय्य दिले जाते.
याआधी, 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांना या योजनेतील 20 व्या हप्त्याची रक्कम पाठवण्यात आली होती. पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सुरू करण्यात आली. या योजनेचा पहिला हप्ता 24 फेब्रुवारी 2019 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. तेव्हापासून आतापर्यंत 20 हप्ते वितरित करण्यात आले आहेत.
दरम्यान, केंद्राच्या या योजनेसह राज्य सरकारही शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 2000 रुपये देते. राज्य सरकारच्या योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याकडे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रथम, [https://pmkisan.gov.in/] वर जा.
होमपेजवर ‘नो युअर स्टेटस’ किंवा ‘बेनिफिशियरी स्टेटस’ वर क्लिक करा.
आता तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार नंबर एंटर करा.
कॅप्चा कोड एंटर करा आणि ‘गेट डेटा’ वर क्लिक करा.
आता संपूर्ण तपशील उघडेल.
या माहितीमध्ये, तुमचे नाव यादीत आहे की नाही, शेवटचा हप्ता कधी मिळाला आणि पुढील हप्त्याची स्थिती तुम्हाला कळेल.
जर साइटवर ‘नो रेकॉर्ड सापडला नाही’ असे दिसत असेल, तर समजून घ्या की तुमचे नाव सध्या यादीतून काढून टाकण्यात आले आहे किंवा पडताळणीच्या अधीन आहे.
या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून वगळण्यात येईल. कृषी मंत्रालयाने केलेल्या तपासणीत असे दिसून आले आहे की अंदाजे ३.१ दशलक्ष शेतकरी ज्यांची नावे संशयास्पद आढळली आहेत. यापैकी पती-पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेत होते. यामध्ये १.७६ लाख अल्पवयीन मुले देखील समाविष्ट आहेत. सरकारने सर्व राज्यांना १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चौकशी पूर्ण करण्याचे आणि चुकीचे लाभार्थी काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
Ans: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची रक्कम पाठवली जाणार आहे.
Ans: देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 21व्या हप्त्यासाठी एकूण 18,000 कोटी रुपये वर्ग करण्यात येणार आहेत.
Ans: पूरस्थितीमुळे पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मी राज्यातील शेतकऱ्यांना आधीच पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता मिळाला आहे.






