धाराशिवच्या रस्त्यांवरून राजकीय रणकंदन!
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी: मागील पंधरा दिवसांपासून शहरातील रस्ते विकास निधीवरुन शहरात भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असे राजकीय रणकंदन पेटले आहे. सुरुवीताला शिवसेना (शिंदे) आणि भाजपमधील सुप्त संघर्ष सांगितले जात होते. मात्र, आता भाजपचे राणाजगजितसिंह पाटील समर्थकांनी अचानक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर टीका करणारे फलक शहरात लावले आहेत. पक्षप्रवेश करतो असे सांगून पालकमंत्र्याकडे भीक मागून धाराशिवचा विकास निधी थांबवण्याचा प्रयत्न करणारा. हीच तुझी लायकी आशा आशयाचे बॅनर शहरात लागले आहेत. हे पाटील समर्थकांनी लावल्याची चर्चा आहे. यावर स्पष्ट असा कोणाचा उल्लेख नसला तरी या माध्यमातून ओम राजेंना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा आहे.
मागील १८ महिन्यांपासून रखडलेल्या १४० कोटीच्या रस्ते कामाची स्थगिती उठवून प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यात आमदार पाटील यांची महत्त्वाची भूमिका होती. मात्र नंतरच्या दोन दिवसांत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः तक्रार करत यावर पुन्हा स्थगिती आणली होती. महायुतीतील घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधी मधील हा वाद विकास कामांच्या आड आल्याने शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
जालन्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढली! ‘या’ नेत्यांनी सपकाळांच्या उपस्थितीत केला प्रवेश
दरम्यान जिल्ह्यातील विरोधकांच्या चुकीच्या माहितीला गृहीत धरून पालकमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांकरवी स्थगिती आणली आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. यावर लवकरच तोडगा निघेल आणि कामे सुरू होतील, असा विश्वास भाजपचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. आमदार पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच निधी मंजूर झाला आहे. काम सुरू झाल्यास आपली अकार्यक्षमता लोकांसमोर येईल, या भीतीने विरोधकांनी या कोमात खोडा घातला आहे. पालकमंत्र्यांच्या तक्रारीचा आधार घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याची बाब दुर्दैवी असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रस्ते कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला म्हणून शहरात आमदार पाटील यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले. लागलीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यारंभ आदेशाला स्थगिती दिली. पालकमंत्र्यांनी दोनवेळा उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. पालकमंत्री आणि आमदार पाटील यांच्यातला हा सुप्त संघर्ष स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीपूर्वी समोर आल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.
भीक मागून धाराशिवचा विकासनिधी थांबवतोस, हीच तुझी लायकी! राणा पाटील समर्थकांची ओम राजेविरोधात तर धाराशिवच्या विकासाचा नुसता भास, कमिशन घेऊन केला स्वतःचा विकास. OK टक्केवारी पॅटर्न महाविकास आघाडीने राणा पाटलांविरोधात बॅनरबाजी केली आहे. ऐन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकमेकांच्या विरोधात ही बॅनरबाजी केल्याने वातावरण तापले आहे. त्यासमोरच भाजपाच्या महिला आघाडीचे स्थगितीविरुद्ध उपोषण सुरू आहे. आघाडीनेही यावेळी स्थगितीविरुद्ध रास्तारोको केला. परिणामी शहरातील राजकीय तापमान वाढले आहे.
भाजपा आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करत माध्यमांना मुलाखती देत आपलीच बाजू कशी खरी आहे. हे सांगण्याचा सपाटा लावला आहे. दरम्यान शिक्षक आमदार विक्रम काळे शहरात असताना त्यांनी महिलांच्या उपोषणस्थळी भेट देऊन स्थगिती लवकरात लवकर उठविण्याचा प्रयत्न करू. राजकारण बाजूला ठेऊन शहराचा रेंगाळलेला विषय मार्गी लावू असे सांगितले आहे.
अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश






