काँग्रेसला धक्का ! प्रदेश उपाध्यक्षा प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये केला प्रवेश
मुंबई : महाराष्ट्रातील दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून, त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी (दि.१८) अधिकृतपणे भाजपमध्ये सामील झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पक्षातील गटबाजीमुळे निराश होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दिवंगत राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर नामांकित केले होते. राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या खूप जवळचे मानले जात होते. कोविड-१९ साथीच्या काळात २०२१ मध्ये त्यांच्या अकाली निधनाने त्यांची राजकीय कारकीर्द संपली. या घडामोडींमुळे भाजपने काँग्रेसला मोठा राजकीय धक्का दिला आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र; केली ‘ही’ मागणी
हिंगोलीच्या राजकारणातील एकेकाळी एक प्रमुख व्यक्ती असलेले दिवंगत खासदार राजीव सातव यांचे नाव अनेकदा त्यांच्या विरोधी पक्षांचे आवाज बंद करत असे. त्यांच्या गोड भाषणाने, मजबूत संघटनाने आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या नेतृत्वाने, राजीव सातव यांनी हिंगोली हे काँग्रेससाठी एक अजिंक्य गड बनवले होते. मात्र, आता त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती
प्रज्ञा चव्हाण यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक बडे नेते या पक्षप्रवेशादरम्यान हजर होते.
शिवसेना ठाकरे गटाला धक्का
दुसरीकडे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाला राम राम ठोकत माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दादरच्या वसंत स्मृतीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेदेखील वाचा : Tejasvi Ghosalkar joins BJP : ठाकरेंशी कौटुंबिक संबंध तरी घोसाळकरांनी का केला भाजप प्रवेश? प्रवीण दरेकर यांनी स्पष्टच सांगितलं






