पंतप्रधान मोदी देणार pm किसान सन्मान निधीचा 18 वा हफ्ता आज देणार आहेत. (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता घेऊन आले आहे. पंतप्रधान हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. मुंबई आणि वाशिममध्ये पंतप्रधान मोदी भेट देणार आहेत. या महाराष्ट्र दौऱ्यावेळी त्यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींच्या आधी लाडक्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील 23,300 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे आणि बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. आरे ते बीकेसी दरम्यान ठाणे आणि मुंबई मेट्रोच्या लाईन 3 मध्ये सुमारे 32,800 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले जाणार आहे. त्याचबरोबर किसान सन्मान निधीचा 18 वा हफ्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 18 वा हप्ता म्हणून सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20 हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 3.45 लाख कोटी देण्यात आले आहेत.
हे देखील वाचा : चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे असतात…; अजित पवार यांचा शरद पवारांना खोचक टोला
शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपये जारी करणार आहेत. कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे 1,920 कोटी रुपयांचे 7,500 प्रकल्प देखील सुरू केले जातील. याशिवाय, 1,300 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या 9,200 शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) देखील सुरु करण्यात येणार आहे.






