शहाजीबापू पाटील भाजपने विधानसभा निवडणूकीत शेकाप पक्षाला मदत केल्याचा आरोप केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Shahaji bapu Patil : सोलापूर : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. एकीकडे राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर एकनाथ शिंदे यांचे नेते देखील अनेक उघड वक्तव्य करत आहेत. यामध्ये गुवाहटी वारी करणारे शहाजी बापू पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने शेकापला मदत केल्याचा आरोप केला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.तसेच नाराजी देखील व्यक्त केली आहे. निवडणुकीत आपल्याला पाडण्यासाठी भाजपने शेतकरी कामगार पक्षाला मदत केल्याचा गंभीर आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला. त्यामुळे सांगोल्यामध्ये महायुतीमध्येच वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एकनाथ शिंदे यांचे नेते आणि माजी आमदार शहाजीबापू हे त्यांच्या काय झाडी काय डोंगर या डायलॉगमुळे चर्चेत आले होते. यानंतर आता त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपमध्ये दगाबाजी केल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. माध्यमांशी संवाद साधून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. माजी आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की, “सांगोल्याची निवडणूक ही स्वाभिमानाची निवडणूक आहे. आपल्याला गुलाम बनवलं जात आहे, हेलिकॉप्टरमधून येऊन यांनी गुंडशाही सुरू केली आहे. भाजपने आपलं कंबरडं मोडलं. विधानसभेला मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली. भाजपसोबत मी इतकं प्रामाणिकपणे वागून ते असं का वागले?” असा प्रश्न शहाजीबापू पाटील यांनी उपस्थित केला आहे.
या तालुक्यात फक्त दोन राजे
पुढे ते म्हणाले की, , “पण मी लढणारी औलाद आहे. पैशाच्या जीवावर तालुका विकत घेऊन जायचा नाद करू नका. मला महाराष्ट्र घाबरतो, आणि ही कुत्री मांजरं आता मला घाबरावयला लागली आहेत. या तालुक्यात दोन राजे… एक गणपतराव देशमुख आणि दुसरा शहाजीबापू. आता गणपतराव देशमुख यांच्या समाधीला पूजनाचा अधिकारी त्यांच्या कार्यकर्त्यांना उरला नाही.” असा आक्रमक पवित्रा शहाजी बापू पाटील यांनी घेतला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यापूर्वी देखील शहाजी बापू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या आजारपणाबद्दल सांगत भावनिक साद घातली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मृत्यूच्या दारात असताना मी भाजपाच्या उमेदवाराला १५ हजारांच मताधिक्य दिलं. याचं फळ म्हणून मला सांगोल्यात एकटं पाडलं का? सांगोल्यात काय चाललं आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे समजत नाही का? फडणवीस यांचा कुठला शब्द मोडला? हे त्यांनी मला सांगावं. १५ हजारांचा लीड आहे माझ्या तालुक्यात लोकसभेला, मोहिते पाटील घराण्यातल्या उमेदवार होता. मी निवडणूक प्रचार सोडून ऑपरेशन केलं असतं तर कॅन्सरपर्यंत आजार गेला नसता. आपले कर्तव्य आहे म्हणून जीवहीं पणाला लावला.” अशा शब्दांत शहाजी बापू पाटील यांनी महायुतीवरील आपली नाराजी व्यक्त केली.






