ठाकरे गट नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील शास्त्रीनगर भागातील प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीमध्ये सरकारस्थापनेपासून मंत्रिमंडळाविस्तारापर्यंत नेत्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे. महायुतीचे अनेक बडे नेते मंत्रिपदाची संधी न दिल्यामुळे नाराज आहेत. दरम्यान, राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत सुषमा अंधारे यांनी धक्कादायक दावा केला आहे.
राज्यामध्ये निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगताना दिसत आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वादंग निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे यांना नागपूर विमानतळावर धमकी देण्यात आली. अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काय आहे सुषमा अंधारे?
सुषमा अंधारे यांनी फेसबुक या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेर संघर्ष सुरू आहे. अशातच आत्ता 3 वाजून 36 मिनिटांनी (पहाटे) नागपूर विमानतळावर बाहेर पडण्यासाठी असलेल्या फाटकाजवळ विचित्र घटना घडली. मी आणि माझी 7 वर्षांची लेक समता सैनिक दलाच्या स्मिता कांबळे यांच्याबरोबर होते. साधारण 6 फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमीप्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणून वर बघितले तर तो जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. गेटवरील सुरक्षारक्षक थोडे पुढे सरसावले, तसा तो जय श्रीरामच्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला.”
पुढे अंधारे यांनी लिहिले आहे की, देवेंद्रजी, आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पाहावी. हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खूप वेळा वाटले. मात्र, दहशत आणि दबावतंत्राचे हे गलिच्छ राजकरण मुख्यमंत्री म्हणून आपल्यापर्यंत पोहचवणे ही नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे असे वाटले. #टीप असे लिहित म्हटले की, “शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही. कारण त्यावर माझा फारसा विश्वास नाही. बाकी आपली मर्जी.” असा टोला सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
हिवाळी अधिवेशन संबंधित अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सध्या राज्यामध्ये नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज (दि.17) हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. मात्र त्यापूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या अज्ञात व्यक्तीने विमानतळावर धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत आता राज्य सरकार कोणते पाऊल उचलणार याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु आहे.