'...ही निवडणूक दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी 16 तारखेला संपणार'; किरीट सोमय्या यांचं मोठं विधान(फोटो- सोशल मिडिया)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ‘मुंबई महानगरपालिका आल्या की ठाकरे सेना आणि काँग्रेसचं वोट जिहाद सुरू झालं आहे. ही महानगरपालिका मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नव्हे तर दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी 16 तारखेला संपणार आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, मुंबई महापालिका आल्या की ठाकरे सेना आणि काँग्रेसचं वोट जिहाद सुरू झालं आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना अनधिकृत मशिद तोडणार नाही, उलट दुप्पट एफएसआय देणार आहेत. अरविंद सावंत तशी पत्रक मुंबईत वाटत आहेत. भेंडीबजार, मोहम्मद अली रोड या ठिकाणी रोज सकाळी ठाकरेंचा भोंगा बांग देतो पण त्याला इथल्या मशिदीवरील अनधिकृत भोंग्याचा गोंगाटावर एक शब्द ही बोलत नाही. विधानसभेत, लोकसभेत ठाकरेंची लाज फक्त आणि फक्त हिरवेधारी मुस्लिमांनी वाचवल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच एका ठाकरे सोबत दुसरे ठाकरे आलेत. आम्ही मुंबईकरांना सावध करतो की, दोघांनी गोल टोप्या घातल्यात ते लोकांना टोप्या घालणार. हिरवी शाल, हिरवेगार मुंबईला बांग्लादेशीमय त्यांना करायचं आहे. यवतमाळ घोटाळा हा एक प्रयोग आहे, छोट्याशा गावात प्रयोग करायचा नंतर राज्यभर बांग्लादेशी अतिक्रमण करायचं असे सध्या सुरु आहे. ही महापालिका मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नव्हे तर दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी १६ तारखेला संपणार आहे, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
किरीट सोमय्या यांची पोलिसांकडे तक्रार
यवतमाळ जिल्ह्यातील शेंदुर्णीनी या छोट्याशा गावात एक प्रकरण समोर आल्यानंतर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बहुतेक जन्म प्रमाणपत्रे पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील लोकांची आहेत. त्यांनी या प्रकरणाची सरकारी चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या फसवणुकीबाबत यवतमाळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
हेदेखील वाचा : Yavatmal News : गावाची लोकसंख्या १५००, तरीही तीन महिन्यांत २७,३९७ नवजात बाळांचा जन्म? भाजप नेत्याची चौकशीची मागणी






