नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर (फोटो - सोशल मीडिया)
नांदेड : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्याचबरोबर राज्यातील एका जागेसाठी लोकसभा पोटनिवडणुक देखील जाहीर केली होती. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक जाहीर असून यासाठी कॉंग्रेसकडून उमेदवार देखील जाहीर करण्यात आला आहे. पत्रक जारी करत काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक झाली होती. यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस नेते खासदार वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला होता. भाजप उमेदवाराला टक्कर देत वसंतराव चव्हाण यांनी विजयश्री खेचून आणला होता. मात्र 26 ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले. यामुळे कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीबरोबर नांदेड लोकसभा पोट निवडणूक जाहीर केली आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या नेत्यांमध्ये जुंपली; मानकरांना रुपाली चाकणकरांचे सडेतोड उत्तर
नांदेडमध्ये कॉंग्रेस नेते वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला होता. मात्र त्यांचे निधन झाल्यामुळे कॉंग्रेसकडून त्यांच्या मुलाला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने नुकतंच एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात काँग्रेसकडून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार की महायुती देखील उमेदवार जाहीर करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
Congress President Shri @kharge has approved the proposal to nominate the following members as party candidates for the bye-elections to the Lok Sabha and Legislative Assembly in the states listed below 👇 pic.twitter.com/D3P3ezx9Ep
— Congress (@INCIndia) October 17, 2024
लोकसभेमध्ये धुराळा
लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसकडून उमेदवारी दिलेल्या वसंतराव चव्हाव यांनी प्रचाराचा धुराळा उडवला होता. त्यांच्यासमोर भाजचे प्रतापराव चिखलीकर हे कडवे आव्हान होते. त्याचबरोबर बहुजन भारत पार्टीकडून हरि पिराजी भोयाळे, इंडियन नॅशनल लिगकडून कौसार सुलताना हे देखील निवडणुकीला उभे होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर वसंतराव चव्हाण यांना देवाज्ञा झाली. यानंतर कॉंग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांच्या जागेवर त्यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीचा जिल्हा काँग्रेसने ठरावही संमत केला होता. त्याप्रमाणे आता रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.