फोटो सौजन्य - सोशल मिडिया
टी20 विश्वचषक 2026 चा विश्वचषक संपला आता भारताचे माजी खेळाडू हे लग्नसमारंभामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. सोशल मिडियावर या खेळाडूंची मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळत आहे. अभिनेत्री कृतिका कामरा आणि क्रिकेट काॅमेंटेटर, होस्ट गौरव कपूर हे लग्नबंधनात अडकले आहेत. काल त्याचे रिसेप्शन पार पडले, यामध्ये अनेक बाॅलिवूडचे कलाकार त्याचबरोबर दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. ११ मार्च रोजी कृतिका कामरा आणि गौरव कपूर यांनी त्यांच्या जवळच्या प्रियजनांच्या उपस्थितीत एका साध्या समारंभात लग्न केले.
काल रात्री या जोडप्याने मित्र आणि उद्योगातील व्यक्तींसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. मलायका अरोरा, फरहान अख्तर आणि विद्या बालन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या रिसेप्शनला हजेरी लावली होती. काही क्रिकेट स्टार देखील उपस्थित होते. रिसेप्शनमध्ये कृतिका कामरा आणि गौरव कपूर खूप आनंदी दिसत होते. दोघांनीही त्यांचा लूक साधा ठेवला होता. कृतिकाने गाऊन आणि हिऱ्यांचे दागिने घातले होते, तर गौरव काळ्या सूटमध्ये दिसला. नवविवाहित जोडप्याने पापाराझींसाठी एकत्र पोज दिली.
काव्या मारनच्या ‘सनरायझर्स’ संघात पाकिस्तान खेळाडू सामील, ऑक्शनमध्ये उधळले २.३४ कोटी रुपये
फरहान अख्तर आणि शिबानी यांनीही गौरव आणि कृतिकाच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. दोघांनीही काळा पोशाख परिधान केला होता. फरहान अख्तरनेही गौरव कपूरच्या लग्नाला हजेरी लावली होती. कृतिका आणि गौरवच्या रिसेप्शनमध्ये अनेक अभिनेत्रीही दिसल्या. रिया चक्रवर्ती देखील उपस्थित होती.
#GauravKapur and #KritikaKamra make a stunning appearance as they step out to meet the media. 💫#FilmfareLens pic.twitter.com/w8irdz6XGm — Filmfare (@filmfare) March 12, 2026
तथापि, विद्या बालन आणि मलायका अरोराच्या गाऊन लूकची चर्चा होती. या रिसेप्शनमध्ये केवळ बॉलिवूड सेलिब्रिटीच उपस्थित नव्हते तर क्रिकेट जगतातील स्टार्स देखील येथे पोहोचले होते. गौरव कपूर हे एक क्रीडा सादरकर्ता आहेत. ते क्रिकेटमधील व्यक्तिमत्त्वांना ओळखतात. म्हणूनच सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी देखील या कार्यक्रमात दिसले. युवराज सिंगनेही त्याची पत्नी हेझलसह गौरव आणि कृतिकाच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावली होती. युवराजने त्यांच्या लग्नाच्या समारंभातही हजेरी लावली होती.






