“ते संपूर्ण देशभरात जिथे जिथे जातात, तिथे मी जातो”; काय म्हणतोय राहुल गांधींचा चाहता
क्रिकेटर,सिनेसृष्टीतील कलाकार यांप्रमाणे राजकीय नेत्यांचा देखील चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या पक्षाच्य़ा धोरणांना पाठींबा देतात. या नेत्यांच्या प्रति असलेला आदर आणि निष्ठा या चाहत्यांकडून कायमच जपली जाते. असंच राहुल गांधींच्या एका चाहत्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हरियाणामध्ये राहणाऱ्या या चाहत्यांने असं काही केलंय की सगळीकडे त्याच्याच नावाची चर्चा रंगत आहे. आहे तरी कोण हा हे जाणून घेऊयात..
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडी आणि तिसरी आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.राज्यात नव्याने सत्ता प्रस्थापित होण्यासाठी सर्वच पक्ष अॅक्शन मोडमध्ये काम करत आहे. यादरम्यानच काँग्रेसचे राहुल गांधी सभेसाठी मुंबईत कालच दाखल झाले होते. केवळ राहुल यांचं भाषण एकायला मिळावं आणि त्यांना प्रत्यक्ष पाहता यावं यासाठी चक्क हरियाणा ते मुंबई असा प्रवास करत राहुल गांधीच्या एका चाहत्याने सभेच्या ठिकाणी हजरी लावली होती.
हरियाणा येथे राहणारा दिनेश वर्मा हा व्यवसायाने शेतकरी आहे. दिनेशची राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाप्रति अत्यंत निष्ठा आहे, हे त्याच्या कृतीतूनच कळून येतं. सभेच्या पूर्वसंध्येला दिनेशने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, राहुल गांधी हे त्याचं प्रेरणास्थान आहेत. देशाच्या राजकारणात राहुल गांधींलसारख्या व्यक्तीमत्त्वाची गरज आहे. जर देशात काँग्रेसची सत्ता आली तर राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा दिनेशने व्यक्त केली. पुढे दिनेश असही म्हणाला की, “ते संपूर्ण देशभरात जिथे जिथे जातात, तिथे मी जातो. मला त्यांचे विचार जाणून घ्यायला आवडतं. राहुल गांधींच्या पक्षाची धोरणं त्यांचा राजकणावरील अभ्यास दांडगा आहे. त्याचे विचार आणि त्याचं भाषण विचार करायला भाग पाडतात. जर काँग्रेस सत्त्तेत आली आणि पंतप्रधान पदावर राहुल गांधी आले तर देशाच्या राजकारणात ऐतिहासिक बाब असेल, असा विश्वास दिनेश वर्माने व्यक्त केला आहे.
हेही वाचा-Raigad: “गोरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार”; आमदार भरतशेठ गोगावले यांचं आश्वासन
राज्यातील विधानसभा निवडणूक ही देशाच्या राजकीय वर्तुळात बदल घडवून आणणारी आहे. नव्याने होणाऱ्या सत्ता प्रस्थापनेकडे जसं राज्यातील जनतेचं लक्ष आहे. तसंच देशपातळीवर देखील या सत्ता प्रस्थापनेचा मोठा परिणाम होणार आहे. राज्यात सध्या लाडकी बहिण योजना आणि इतर अन्य कल्याणकारी योजनेबद्दल महायुतीचं पारडं विजयाच्या दिशेने झुकलं जाईल असा विश्वास जनतेकडून व्य़क्त केला जात आहे. मात्र अंतिम निकालानंतर राज्यात कोणाची सत्ता स्थापन होईल ? तसंच महायुती आणि तिसरी आघाडी यांच्यातील अतीतटीचा सामना पाहता कोण मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.