फोटो सौजन्य- pinterest
पंचांगानुसार, अनंत चतुर्दशी यावेळी शनिवार, 6 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी भाविक गणेशमूर्तीचे दहा दिवसानंतर विसर्जन करतात. गणपतीला निरोप देणे हा एक भावनिक क्षण आहे, परंतु हा निरोप योग्य पद्धतीने देणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही लोक घरामध्ये अनंताची देखील पूजा करतात. विसर्जन करताना कोणत्या चुका करणे टाळले पाहिजे ते जाणून घ्या
अनंत चतुर्दशी तिथीची सुरुवात शनिवार, 6 सप्टेंबर रोजी पहाटे 3.12 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती रविवार, 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1.41 वाजता होणार आहे. या काळात गणपती बाप्पाच्या विसर्जनासोबतच घरामध्ये अनंताची पूजा देखील केली जाते. असे करणे शुभ मानले जाते.
बाप्पाच्या विसर्जनावेळी नदी किंवा तलाव, समुद्रामध्ये शक्यतो विसर्जन न करता कृत्रिम तलावांमध्ये किंवा घरी विसर्जन करावे यामुळे जल प्रदूषण होणार नाही.
विसर्जनासाठी नेण्यापूर्वी मूर्ती तुटलेली नाही याची विशेष काळजी घ्या. तुटलेल्या मूर्तीचे विसर्जन करणे अशुभ मानले जाते.
विसर्जनापूर्वी गणपती बाप्पाची आरती आणि पूजा करावी. त्यानंतर मोदक, लाडू आणि फुले त्यांना अर्पण करावे. असे न करता विसर्जन करणे अशुभ मानले जाते.
मूर्ती पाण्यामध्ये टाकून न देता तीन वेळा खाली वर करा. त्यानंतर ती हळूहळू खाली नेऊन सोडून द्या अशा पद्धतीने आदरपूर्वक तिचे विसर्जन करा.
विसर्जनाच्या दिवशी मादक पदार्थांचे सेवन करू नये. या दिवशी पूर्णपणे सात्विक राहून शुद्ध अंतःकरणाने परमेश्वराला निरोप द्यावा.
विसर्जनानंतर मागे वळून पाहू नये असा एक समज आहे. पुढच्या वर्षी परत येण्याचे वचन देऊनच देवाला निरोप द्यावा.
अनंत चतुर्दशीचा दिवस हा दहा दिवसांच्या गणेश चतुर्थीचा शेवट असतो. या दिवशी केले जाणारे विसर्जन हे केवळ मूर्तीचे विसर्जन नसून ते देवासोबतच्या सर्व दुःखांचे आणि संकटांचे विसर्जन करण्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे निरोप देताना भक्ती, आदर आणि योग्य विधींसह दिला जातो. असे म्हटले जाते की, त्यामुळे पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा आपल्या घरी येऊ शकतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)