फोटो सौजन्य- pinterest
उद्या म्हणजेच मंगळवार, 10 जून रोजी ज्येष्ठ महिन्याचा शेवटचा मंगळवार आहे. त्यालाच बडा मंगळ असे म्हटले जाते. या दिवशी काही उपाय केल्यास जीवनातील सर्व समस्येमधून सुटका होते अशी मान्यता आहे.
ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या सर्व मंगळवाराला बडा मंगल म्हणून ओळखले जातात. हा दिवस भगवान राम आणि हनुमानजीचे भक्त यांना समर्पित आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी काही उपाय केल्यास जीवनातील सर्व समस्येतून सुटका होते.
ज्येष्ठ महिन्यातील शेवटचा मंगळवार उद्या 10 जून रोजी आहे. हनुमानाचे प्रत्येक भक्त हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात आणि या लोकांनी काही उपाय केल्यास त्याचे अनेक लाभ भक्तांना होतात अशी मान्यता आहे. या दिवशी कोणते उपाय करायचे जाणून घ्या
शेवटचा मंगळवार 10 जून रोजी आहे. या दिवशी पूजा केल्याने लोकांच्या जीवनात मोठा बदल होऊ शकतो. या दिवशी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी सुपारी अर्पण करा, लवंगाची माळ, लवंग आणि वेलचीची माळ अर्पण करा, पिंपळाच्या पानावर ‘राम’ लिहा आणि अर्पण करा. या सर्व गोष्टी अर्पण केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात अशी मान्यता आहे.
असे सर्व उपाय केल्याने भक्तांच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. मोठ्या मंगळवारी असे केल्याने हनुमानजी आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्यावर आपला आशीर्वादाचा वर्षाव करतात. मोठ्या मंगळवारी हनुमानजींना ‘राम’ लिहिलेला लवंगाचा हार किंवा पिंपळाच्या पानाचा हार अर्पण केल्यास तुम्हाला अनेक फायदे होतात. जर तुम्ही 5 किंवा 11 पानांवर ‘राम’ लिहून अर्पण केले तर त्याचे शुभ फळ मिळतात. या माळा अर्पण केल्याने भक्तांचे कल्याण होते अशी मान्यता आहे.
कोणताही भक्त कर्जाच्या ओझ्याखाली असेल तर शेवटच्या दिवशी लवंगाच्या माळेचा उपाय केल्यास त्याची निश्चितच कर्जातून मुक्तता होते अशी मान्यता आहे. भक्ताला कर्जातून बाहेर पडण्यासाठी मोठ्या मंगळवारी हा उपाय केल्यास त्याचा भक्ताला अत्यंत फायदा होतो.
मोठ्या मंगळवारी हे अचूक उपाय केल्यास जीवनातील सर्वात मोठ्या समस्या मुळापासून दूर होण्यास मदत होते. नोकरीची समस्या असो, शत्रूंची समस्या असो किंवा जीवनातील संकटे असोत, शक्ती असो वा बुद्धी असो, पैसा असो वा कुटुंब असो – बडा मंगळवारी प्रत्येक समस्या सोडवता येते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)