फोटो सौजन्य- pinterest
चंद्र देवाने आज शुक्रवार 27 जून रोजी आपल्या राशीत बदल केला आहे. यावेळी चंद्र कर्क राशीत असल्याने त्याचा स्वामी चंद्र आहे. याचा प्रभाव काही राशीच्या लोकांवर सकारात्मक पडेल. कोणत्या भाग्यवान राशी आहेत त्या, जाणून घ्या
चंद्र देवाने शुक्रवार, 27 जून रोजी पहाटे 1.39 वाजता कर्क राशीमध्ये प्रवेश केला आहे. त्याआधी ते मिथुन राशीमध्ये होते. चंद्र देव आता रविवार, 29 जून रोजी सकाळी 6.36 पर्यंत कर्क राशीमध्ये राहतील नंतर कन्या राशीमध्ये प्रवेश करतील. आज सकाळी चंद्राने केलेले संक्रमण खूप खास आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चंद्राने स्वतःच्या कर्क राशीमध्ये प्रवेश केलेला आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे ज्याला विचार, आनंद, मन, मनोबल, मानसिक स्थिती याचे प्रतीक मानले जाते.
ज्यावेळी चंद्र एखाद्या राशीमध्ये किंवा नक्षत्रात प्रवेश करतो त्यावेळी त्याच्या उर्जेमध्ये वाढ झालेली असते. तो बलवान बनलेला असतो. त्यामुळे त्याच्या या संक्रमणाचा परिणाम सर्व 12 राशीच्या लोकांवर होतो. चंद्राच्या कृपेने कोणत्या राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे, जाणून घ्या
आज चंद्रदेवाने मिथुन राशीतून कर्क राशीमध्ये संक्रमण केले आहे. यामुळे दोन्ही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. ज्या लोकांना काही दिवसांपासून पैशांची कमतरता जाणवत आहे अशा लोकांच्या समस्या सुटून त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. कला, आरोग्य आणि राजकारणाशी संबंधित लोकांच्या कामाला समाजात मान्यता मिळेल. तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करु शकतात. न्यायालयामध्ये कोणत्याही प्रकारचा खटला सुरु असल्यास निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.
चंद्रदेवाने स्वतःच्या कर्क राशीत संक्रमण केले असल्याने या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. तुम्ही आज बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकतात. तुमच्या नात्यांमधील असलेले मतभेद दूर होतील. चंद्रदेवाच्या कृपेने तुमच्यावरील आर्थिक संकट दूर होऊ शकते. कामानिमित्त परदेश प्रवास करु शकतात. तसेच नवीन गोष्टी खरेदी करु शकता.
मिथुन आणि कर्क राशी सोडल्यास चंद्राचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील शुभ राहणार आहे. वृद्ध लोक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यास या लोकांना मानसिक शांती मिळू शकते. व्यावसायिकांचे कोणतेही कामे प्रलंबित राहिले असतील ज्यामुळे तुमचे होत असलेल्या नुकसातून सुटका होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)