मकर संक्रांतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा चमचमीत भोगीची भाजी
दरवर्षी मकरसंक्रांतीच्या आधल्या दिवशी भोगी साजरा केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात भोगी सणाला विशेष महत्व आहे. हा दिवस अत्यंत शुभ मनाला जातो. तसेच हिवाळी हंगामातील भाज्यांचा वापर करून भोगीची भाजी बनवली जाते. त्यात गाजर, रताळे, भोपळा, घेवडा, वांगी, तोंडली, मटार इत्यादी वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात. भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी खाल्ली जाते. ही भाजी केवळ परंपरा म्हणून नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला तीळ, शेंगदाणे आणि मसालेदार पदार्थांची आवश्यकता असते. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होत्ता. भोगीच्या भाजीसोबत खाल्ली जाणारी भाकरी शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. कारण यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होते. बऱ्याचदा लहान मुलं भाज्या खाण्यास नकार देतात. अशावेळी मुलांना तुम्ही भोगीची मिक्स भाजी खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया भोगीची मिक्स भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
चिकाच्या दुधापासून फक्त 15 मिनिटांतच बनवा मऊ आणि जाळीदार ‘खरवस’, लहानच काय तर मोठेही होतील खुश






