फोटो सौजन्य- pinterest
लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी सर्वत्र केली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केल्यानंतर बहुतेक वेळा सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. मात्र यावर्षी लक्ष्मीपूजन मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी मोठ्या उत्साहात लक्ष्मीपूजन साजरे केले जाणार आहे.
यंदा कार्तिक अमावस्या दोन दिवसांची आहे. कार्तिक अमावस्येची सुरुवात दुपारी 3.44 वाजता होणार आहे आणि 21 ऑक्टोबरला सायंकाळी 5.54 वाजता संपेल. मात्र यावेळी लक्ष्मीपूजनाची पूजा 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी केली जाणार आहे.
ॐ महालक्ष्मै च विद्महे विष्णुपतन्यै च धीमहि|
तन्नौ लक्ष्मी प्रचोदयात
देवीची पूजा करताना या मंत्रांचा जप केला जातो. या मंत्रोच्चाराचेच लक्ष्मीपूजनाची सुरूवात होते.
श्री सूक्तमध्ये तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम|
यस्यां हिरणं विंदेयं गामश्व पुरूषानहम||
हे जातवेदस! जी प्राप्त होताच मी सुवर्ण, गाई, घोडे आणि इष्ट मित्र मिळवू शकेन अशी अविनाशी लक्ष्मी मला तू दे. अशी मागणी श्री सूक्ततून केली आहे.
लक्ष्मी चंचल नाही तर लक्ष्मीवान माणसाची मनोवृत्ती चंचल आहे. वित्त ही एक शक्ती आहे त्याने मानव देवही बनवू शकतो आणि दानवही बनू शकतो. सुईच्या छिद्रातून उंट जाईल पण श्रीमंताला स्वर्ग मिळणार नाही, असे एका धर्मात सांगितले आहे. पण भारतीय संस्कृतीनुसार लक्ष्मीवान, धनवान व्यक्ती देवाचे लाडके आहेत. गेल्या जन्मातील पुण्याईने त्यांच्यावर लक्ष्मीमाता प्रसन्न झाली आहे. तसेच लक्ष्मीला भोगप्राप्तीचे साधन समजणारा मानव पतनाच्या खोल गर्तेत गडगडत जातो. तर लक्ष्मीचे मातृवात पूजन करून तिला प्रभूंचा प्रसाद समजणारा मानव स्वतः पवित्र बनतो.
विपरीत मार्गाने वापरलेली, मिळेलीही अलक्ष्मी असते. ती स्वार्थासाठी वापरली जाते. जी लक्ष्मी आणि प्रभूकार्यासाठी वापरली जाते ती महालक्ष्मी. ती हत्तीवर बसून वाजत गाजत येते. हत्ती औदार्यचे प्रतीक आहे. सांस्कृतिक कार्यात उदार हाताने लक्ष्मी खर्च करणार्याच्या घरात ती पिढ्यानुपिढ्या टिकून राहते. त्यामुळे लक्ष्मी चांगल्या, सद्गुणी, सदविचारी राहते. पण लक्ष्मीमाता प्रसन्न झाल्यानंतर ते उतणार नाहीत, मातणार, माझ्या दैवी विचारांत बदल होणार नाहीत यांची सदैव काळजी घेतली पाहिजे.
हिंदू धर्मात दिवाळी सणाची तयारी खूप आधीच सुरु होते. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. हा सण पाच दिवस चालतो. धनत्रयोदशीपासून दिवाळीच्या सणाचा पहिला दिवस सुरु होते. दिवाळीला देवी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्याच्या अमावस्येला समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी प्रकट झाली, मान्यता आहे.
मान्यतेनुसार, कार्तिक महिन्यामध्ये सुख, समृद्धी आणि सर्व प्रकारची संपत्ती देणारी देवी लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर येते आणि प्रत्येक घरात फिरते, असे म्हटले जाते. या काळामध्ये घरांमध्ये चांगली प्रकाशयोजना, सकारात्मक ऊर्जा, स्वच्छता, पूजा आणि सतत मंत्रांचा जप असतो, त्या घरांमध्ये देवी लक्ष्मी अंशाच्या रूपात राहते. प्रदोष काळात लक्ष्मीपूजन गृहस्थांना मान्य असते, तर महानिषथ काळात लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)