फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये अमावस्येला धार्मिक महत्त्व आहे. असे मानले जाते की, पित्तरांच्या नावाने दान केल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होऊ शकते. या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक समस्या देखील दूर होतात. 14 जुलै रोजी ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाणार आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय केल्याने जीवनात सुख शांती येते जाणून घ्या
पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीची सुरुवात १३ जुलै रोजी सायंकाळी ६:४९ वाजता होणार आहे आणि मंगळवार, १४ जुलै रोजी दुपारी ३:१२ वाजता अमावस्या संपणार आहे. उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावस्या मंगळवार, १४ जुलै रोजी आहे.
जर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश हवे असेल तर तुळशीचे रोपामधील माती काढून त्यामध्ये पाणी टाकून लेप तयार करावा. हा लेप शरीराला लावावा. त्यानंतर स्नान करावे. यानंतर भगवान विष्णूंची पूजा अर्चना करावे. असे म्हटले जाते की त्यामुळे प्रगती लवकर होते.
शत्रूंपासून सुटका मिळवण्यासाठी या दिवशी भगवान विष्णूंच्या12 नावांचे स्मरण करताना त्यांना पिवळी फुले अर्पण करताना भगवान विष्णूच्या १२ नावांचा जप करा. त्यांची नावे- अच्युत, अनंत, दामोदर, केशव, नारायण, श्रीधर, गोविंद, माधव, ऋषिकेष, त्रिविकरम, पद्मानाभ आणि मधुसूदन. त्यानंतर अर्पण केलेली फुले माता पाण्यामध्ये अर्पण करा किंवा झाडाच्या खाली ठेवा.
पितृदोषापासून सुटका मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी गरजूवंतांना अन्न आणि वस्त्र दान करावे. यामुळे पितरांचे आशीर्वाद राहतात.
जीवनात सुख समृद्धी राखण्यासाठी एक नारळ घेऊन त्यावर स्वस्तिकचे चिन्ह काढून ते भगवान विष्णूंना अर्पण करा. त्यानंतर नारळ घरामध्ये सर्वांना प्रसाद म्हणून द्या. या उपायांमुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी राहील.
तुमच्या घरात नकारात्मक शक्ती असल्यास ती दूर करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आंघोळीनंतर हळदीची पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर त्याने घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला स्वस्तिक काढून घ्या. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईलच सोबतच देवी लक्ष्मीचे आशीर्वाद राहतील. ज्यामुळे आर्थिक समस्या जाणवणार नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: काळे तीळ अर्पण करणे, तर्पण करणे, गरजूंना अन्नदान करणे आणि पितरांसाठी प्रार्थना करणे लाभदायक मानले जाते.
Ans: लक्ष्मी-नारायणाची पूजा, दीपदान, दानधर्म आणि श्रद्धेने मंत्रजप केल्याने सकारात्मक फल मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.
Ans: हा दिवस पितृस्मरण, दान, जप, तप आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो.






