पावसाळ्यात पोटाचे विकार कशामुळे होतात? वाढत्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय, राहाल कायमच फिट
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. मुसळधार पावसात सतत भिजल्यामुळे सर्दी, खोकला, ताप यासोबतच पोटाचे विकार सुद्धा होतात. या दिवसांमध्ये उलट्या, जुलाब, अन्नातून विषबाधा, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, टायफॉइड आणि हिपॅटायटीस ए यांसारखे गंभीर आजार झपाट्याने वाढतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला गंभीर आजाराची लागण झाल्यास रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. ज्याच्या परिणामामुळे खूप जास्त थकवा, अशक्तपणा जाणवतो. पावसाळ्यात दूषित पाणी, आर्द्रतेमुळे जिवाणू आणि विषाणूंची वाढ झपाट्याने होते आणि आरोग्य बिघडते. पावसाचे दूषित पाणी शरीरात गेल्यानंतर रक्तात मिक्स होते आणि शरीराला वेगवेगळ्या आजारांची लागण होऊन आरोग्य बिघडते.(फोटो सौजन्य – istock)
पचनाचे विकार वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये फारसे लक्ष दिले जात नाही. पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. विषाणूंची झपाट्याने वाढ झाल्यामुळे अन्नपदार्थ खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात पोटात वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
पावसाळ्यात पोटाचे विकार होण्याची जास्त शक्यता असते. बहुतांश संसर्ग हे दूषित पाणी पोटात गेल्यामुळेच होतात. मुसळधार पावसात हानिकारक जिवाणू गटारात आणि दूषित पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपर्यंत पोहचतात. हे पाणी दिसायला जरी स्वच्छ असले तरी ते स्वच्छ नसते. पाण्यात अनेक हानिकारक विषाणू आणि घातक किटाणू असतात. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर कायमच उकळलेले, गाळलेले किंवा पॅकेज केलेले पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर सुद्धा देतात. पाण्याची गुणवत्ता शरीरावर थेट परिणाम करते. चांगल्या जलशुद्धीकरणाच्या किंवा क्लोरीनेशनच्या गोळ्या सुद्धा पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जातात. त्यामुळे उघड्यावरील किंवा दूषित पाण्याचे अजिबात सेवन करू नये.
Belly Fat: सुटलेले पोट होईल फ्लॅट! जिमचीही गरज नाही, घरीच करा ‘हे’ सोपे व्यायाम
पावसाळ्यात विकतचे किंवा तिखट, तेलकट पदार्थ अजिबात खाऊ नये. दमटपणामुळे जिवाणू आणि इतर सूक्ष्मजंतू वेगाने वाढतात आणि अन्नपदार्थ खराब होऊन जातात. काहीवेळा खराब अन्नपदार्थ वेळीच ओळखता न आल्यामुळे पचनाचे विकार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात कायमच ताजे आणि घरी बनवलेले फ्रेश, हेल्दी अन्नपदार्थ खावेत. उघड्यावरचे रस्त्यावरील अन्न, आधीच कापलेली फळे आणि बराच काळ बाहेर ठेवलेले स्नॅक्स खाल्ल्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो.
Ans: पावसाळ्यात दूषित पाणी, जिवाणूंची वाढ, अपुरी स्वच्छता आणि बाहेरचे अन्न खाल्ल्यामुळे पोटाचे विकार वाढण्याची शक्यता अधिक असते.
Ans: रस्त्यावरील उघडे खाद्यपदार्थ, कच्चे सॅलड, दूषित पाणी, अर्धवट शिजलेले अन्न आणि जास्त तेलकट पदार्थ टाळावेत.
Ans: नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या, हात स्वच्छ धुवा, ताजे आणि गरम अन्न खा, फळे-भाज्या स्वच्छ धुवूनच वापरा आणि बाहेरचे अन्न कमी खा.






