फोटो सौजन्य- pinterest
गीता जयंतीच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले. म्हणजेच त्यांनी युद्धभूमीवर अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील मोक्षदा एकादशी तिथीचा होता. तेव्हापासून गीता जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी गीता जयंती कधी आहे, महत्त्व आणि या दिवशी काय करायचे ते जाणून घेऊया.
एकादशी तिथीची सुरुवात रविवार, 30 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वाजता होत आहे आणि सोमवार, 1 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.2 वाजेपर्यंत चालेल. अशावेळी सोमवार, 1 डिसेंबर रोजी गीता जयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा विधीपूर्वक केली जाते.
गीता जयंतीच्या दिवशी सकाळी आवरुन झाल्यानंतर देव्हारा स्वच्छ करुन घ्या आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करा. यानंतर भगवान श्रीकृष्णासमोर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर, त्यांना पिवळी फुले, तुळशीची पाने, फळे आणि पिवळी मिठाई अर्पण करा. भगवद्गीतेचे पठण करा. जर तुम्ही सर्व अध्याय वाचले नसतील तर किमान अध्याय १२ आणि १५ वाचा. नंतर श्रीकृष्णाला समर्पित असलेल्या मंत्रांचा जप करा.
गीता जयंतीच्या दिवशी भगवद्गीतेचे पठण अवश्य करावे. यामुळे पुण्यप्राप्ती होते.
शुभ परिणामांसाठी, तुम्ही या दिवशी मोक्षदा एकादशीचे व्रत देखील करू शकता.
या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी आणि त्यांच्या मंत्रांचा जप करावा.
“ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करा.
गीता जयंतीच्या दिवशी फक्त सात्विक अन्नाचे सेवन करावे.
गीता जयंतीच्या दिवशी दान करणे शुभ आहे. म्हणून गरिबांना अन्न, कपडे किंवा पैसे यांचे दान करावे.
गीता जयंतीच्या दिवशी तामसिक अन्न खाणे टाळावे. मांस आणि मद्यपानापासूनही दूर राहावे.
या दिवशी कोणतेही नकारात्मक विचार टाळा.
स्नान न करता किंवा अस्वस्थ मनाने गीतेचे पठण सुरू करू नका.
जर तुम्ही गीता पठण करत असाल तर संपूर्ण अध्याय वाचल्यानंतरच उठा.
एकादशी असल्याने या दिवशी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करू नका किंवा त्याची पाने काढू नका.
आंघोळ केल्याशिवाय किंवा घाणेरड्या हातांनी श्रीमद्भगवद्गीतेला स्पर्श करू नका किंवा त्याचे पठण करू नका.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: गीता जयंती 1 डिसेंबर रोजी आहे
Ans: ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रात भगवद्गीतेचा उपदेश केला तो दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो
Ans: एकादशी तिथी 30 नोव्हेंबरला रात्री सुरु होते. उद्य तिथीनुसार व्रत उत्सव सूर्योद्याच्या दिवशी मानला जातो. त्यामुळे 1 डिसेंबरला गीता जयंती साजरी केली जाणार आहे






