नजर लागत असेल तर काय करावे (फोटो सौजन्य - Google Gemini AI)
अनेक लोक नजर दोषाला अंधश्रद्धा मानतात, तर काही लोक ती नकारात्मक ऊर्जा म्हणून पाहतात. विशेषतः लहान मुलांना वाईट नजरेचा त्रास होतो असे मानले जाते आणि लहान मुलांवरही वाईट नजरेचा परिणाम होतो असे म्हटले जाते. पण यासोबतच मोठ्यांनाही वाईट नजरेचा त्रास होतो.
लाल किताबसह अनेक पुस्तकांमध्ये ते टाळण्यासाठी आणि वाईट नजरेचा त्रास दूर करण्यासाठी उपायांचा उल्लेख आहे. आज, जर तुम्हाला किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला वाईट नजरेचा त्रास झाला असेल तर तो कसा दूर करायचा ते जाणून घ्या. तसेच, वाईट नजर किंवा नकारात्मक शक्तींपासून बचाव करण्यासाठी काय करावे याबाबत ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत (फोटो सौजन्य – iStock)
मिरच्यांनी वाईट नजर काढणे
जर एखाद्या मुलाला किंवा प्रौढाला वाईट नजर लागली असेल तर २-३ सुक्या लाल मिरच्या घ्या आणि त्या बाधित व्यक्तीच्या डोक्यावर ७ वेळा फिरवा आणि त्या अग्नीत जाळून टाका. बाधित व्यक्तीने ते जळतानाही पहावे, असे केल्याने वाईट नजर निघून जाते असे सांगण्यात येते. असं म्हणतात की सुक्या मिरच्यांनी दृष्ट काढल्यामुळे ज्या व्यक्तींची नजर लागलेली असते त्याची नकारात्मकता लवकर निघून जाण्यास मदत मिळते. मिरचीचा ठसका ही नजर कमी करतो.
Sun Transit: सूर्य करणार कर्क राशीमध्ये संक्रमण, या राशीच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार मोठे यश
मोहरी आणि मीठ
जर तुमच्याकडे मिरच्या जाळण्याची सोय नसेल, तर हातात मोहरी आणि मीठ घ्या, नंतर ते वाईट नजरेने प्रभावित झालेल्या व्यक्तीच्या डोक्यावर ७ वेळा फिरवा. त्यानंतर मीठ आणि मोहरी धुवा किंवा बेसिनमध्ये ओता. त्यानंतर हात आणि चेहरा धुवा. तुम्ही मीठ आणि मोहरीने काढलेली नजर जाळूनही टाकू शकता. हादेखील एक पर्याय आहे
वाईट नजरेपासून बचाव करण्याचे उपाय
Zodiac Sign: चंद्राधी योगाचा अनोखा संगम, या राशींच्या लोकांना भरपूर कमाईची संधी
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.