करवा चौथच्या दिवशी कोणता अशुभ योग (फोटो सौजन्य - iStock)
कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला करवा चौथ व्रत पाळले जाते. पत्नी आपल्या पतींना दीर्घायुष्य आणि वैवाहिक आनंद मिळावा म्हणून हा व्रत पाळतात. करवा चौथ व्रत अत्यंत कठीण मानले जाते कारण त्यात पाण्याशिवाय उपवास करावा लागतो. सकाळी सरगी (ज्यामध्ये गोड पदार्थांचा समावेश असतो) खाल्ल्यानंतर रात्री चंद्राचे दर्शन घेतल्यानंतरच उपवास सोडला जातो. विवाहित महिला दिवसभर पाण्यापासून दूर राहतात. या दिवशी त्या स्वतःला वधूसारखे सजवतात, मेहंदी लावतात आणि नंतर पूजा केल्यानंतर रात्री चंद्राला अर्घ्य अर्थात जल अर्पण करून उपवास सोडतात.
मात्र यावर्षी या दिवशी अशुभ संयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे करवा चौथच्या दिवशी उपवास करताना आणि पूजा करताना तुम्ही योग्य मुहूर्त बघून मगच करावा असा सल्ला ज्योतिषाचार्य आनंद पाठक यांनी दिला आहे. याबाबत अधिक माहिती आपण लेखातून घेऊया.
Chandra Gochar: कोजागिरी पौर्णिमेपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन, आनंदाने उजळून निघणार आयुष्य
करवा चौथ कधी आहे?
या वर्षी करवा चौथ १० ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. संध्याकाळी चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर उपवास सोडला जाईल. त्यापूर्वी करवा चौथचे विधी केले जातील. असे मानले जाते की देवी पार्वतीने भगवान शिवासाठी करवा चौथ आणि पांडवांसाठी द्रौपदीने पाळले होते. या व्रताच्या प्रभावामुळे विवाहित महिलांना शाश्वत सौभाग्य लाभते आणि त्यामुळेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करण्यात येते. उत्तर भारतात हे व्रत अधिक प्रमाणात केले जाते. विशेषतः उत्तर भारतीय महिला ज्या पंजाबी, गुजराती, मारवाडी, बिहारी महिला आहेत त्या हे व्रत आवर्जून करतात.
करवा चौथ अशुभ योग
या वर्षी करवा चौथ व्रतावर अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत आहेत. करवा चौथवर सिद्धी आणि व्याप्ती योग तयार होत आहेत. दरम्यान, करवा चौथवरही व्यतिपात योग तयार होत आहे, जो ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ मानला जातो. या योगाच्या अशुभ परिणामांपासून वाचण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५:४२ वाजेपूर्वी पूजा करा. त्यानंतर, फक्त चंद्रोदय आणि चंद्र देवाला अर्घ्य अर्पण करणे बाकी आहे.
करवा चौथचा चंद्रोदय १० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:४२ वाजता होईल. तथापि, शहरानुसार चंद्रोदयाची वेळ थोडीशी बदलू शकते. ढगाळ हवामानामुळे चंद्रोदय होण्यास उशीर होऊ शकतो. त्यानंतर, चंद्राचे दर्शन करून चाळणीतून तुमच्या पतीकडे पहा आणि नंतर तुमच्या पतीच्या हातातून पाणी घेऊन उपवास सोडा. असे केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते आणि ७ जन्म आपल्याला हवा असणारा पतीच मिळतो असा समज आहे.
Venus Transit: 9 ऑक्टोबर रोजी शुक्र बदलणार आपली राशी, कसा राहील सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.