फोटो सौैजन्य: गुगल
MahashivRatri 2025 : हिंदू पुराणानुसार असं म्हटलं जातं की, संपूर्ण विश्वाचे पालनहार हे ब्रम्ह विष्णू आणि महेश या देवता करतात. महादेव जसे रागीष्ट आहेत तसेच ते दयाळू देखीस आहेत म्हणूनच महादेवांना भोलेनाथ देखील म्हटलं जातं. चारधाम यात्रा, ज्योतिर्लिंग या तीर्थक्षेत्रांमध्ये शिवशंकराचा वास आहे. त्यामुळे भोलेनाथांचा कृपाशिर्वाद मिळावा म्हणून भाविक यात्रेला जातात. हिंदू धर्म हा भाराताच्या चहू बाजूंना व्यापलेला आहे म्हणूनच विविध राज्यात शिवाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. महाराष्ट्रातील अनेक कुळांचं कुलदैवत हे शिवशंकराचा अवतार असल्याचे सांगितले आहेत. या देवस्थानांची माहिती जाणून घेऊयात.
जेजुरी
येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट असा जयघोष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकू येतो. कोळी , धनगर, आणि आदी कुळांचा रक्षक म्हणून अनेक कुळांचा कुलदैवत या अर्थाने जेजुरीच्या खंडोबाला भाविक मनोभावे पुजतात. चंपाष्ठी आणि सोमवी अमावस्या या दरम्यान भाविकांची सोन्याच्या या जेजुरीत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. जेजुरगडावरील खंडेरायाचं मंदिर हे दाक्षिणात्य स्थापत्य शैलीतील दिसून येतं. असं म्हणतात की मल्हहारी या राक्षसाचा वध करण्यासाठी महादेवांनी खंडेरायाचा अवतारा घेतला. मल्हहारी राक्षसाचा वध केला म्हणून मार्तंड मल्हारी असं नाव खंडेरायाचं प्रचलित झालं, अशी आख्यायिका सांगितली जाते. महादेव आणि पार्वती यांचं नातं अतूट आहे. त्यामुळे त्यांचा आशिर्वाद वैवाहिक आयुष्य़ाला मिळावा म्हणून नवविवाहीत जोडपं जेजुरीला दर्शनासाठी जातात. त्यावेळी देवाचा गोंधळ घातला जातो. तसंच खोबरं आणि भंडारा उधळण्याची प्रथा आहे.
म्हस्कोबा
पुरंदर तालुक्याला इतिहास आणि धर्मिक वारसा लाभलेला आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुरंदरची भूमी म्हस्कोबा देवस्थानासाठी देखील प्रसिद्ध आहे. भैरवाचा अवतार म्हणजे म्हस्कोबा. हा म्हास्कोबा स्मशानात प्रकट झाला अशी आख्यायिका सांगितली जाते. पुणे सातारा दरम्यान सासवडच्या जवळ वीर या ठिकाणी श्री क्षेत्र म्हस्कोबा देवस्थान आहे. “सवाई सर्जाचं चांगभलं! असा जयघोष भाविक करतात. हा म्हस्कोबा शंकराचा अवतार असल्याने महाशिवरात्रीला या ठिकाणी दोन आठवडे मोठा उत्सव असतो.
ज्योतिबा
आई अंबाबाई प्रमाणे अनेक कुळांचा ज्योतिबा हा कुलदैवत आहे. कला, क्रीडा आणि इतिहासाचा वारसा जपणाऱ्या या रांगड्या कोल्हापुरात एका डोंगरावर ज्योतिबांचं स्थान आहे. वैशाख आणि चैत्र महिन्यातील पौर्णिमेला इथे मोठा उत्सव साजरा होतो. शिवाचा अवतार असलेल्या ज्योतिबाचा डोंगर पन्हाळा परिसरात आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीला देखील भाविक मोठ्या संख्येने येतात.
मंगेशी
स्वतंत्र राज्य होण्यापुर्वी गोवा कोकणप्रांतात मोडला जात असे. त्यामुळे गोव्यातील हिंदू कुळांच्या चालीरीती या कोकणी जीवनशैलीशी मिळती जुळती आहे. गोव्यातील हिंदु धर्मिय कुळांचा कुलदैवत हे मंगेशी आहे. श्री क्षेत्र मंगेशी. शिवशंकराचा अवतार असलेलं हे देवस्थान म्हणून ओळखलं जातं. पांढऱ्या रंगाचं असलेलं हे मंदिर आत्मिक शांतता देतं. समुद्राव्यतिरिक्त देखील मंगेशी देवस्थान हे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
रवळनाथ
तळकोकण आणि गोव्याच्या सीमेवरील गावांतील कोकणस्थ कुळांचं कुलदैवत हे रवळनाथ आहे. रवळनाथ हा शिवशंकराचा अवतार असल्याचं म्हटलं जातं. वेतोबा, रामेश्वर आणि सिंधुदुर्गमधील कणकवलीची ग्रामदेवता गांगोभैरी या विविध नावाने महादेवांची पुजा केली जाते. सावंतवाडी आणि गोवा या आसपासच्या परिसरातील अनेक कुळाचं कुलदैवत रवळनाथ आहे.