फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप खास मानले जाते. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपवास करण्याची प्रथा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने भक्तांना भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो. मोक्षदा एकादशी ही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला येते.
जे लोक भगवान विष्णूची पूजा करतात आणि मोक्षदा एकादशी व्रत पाळतात अशा लोकांसाठी वैकुंठाचे दरवाजे उघडतात. त्यांना मृत्युनंतर मोक्ष मिळतो, असे म्हटले जाते. मोक्षदा एकादशी कधी आहे, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
पंचांगानुसार, यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात 30 नोव्हेंबर रोजी रात्री 9.29 वाजता होत आहे. या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबर रोजी सकाळी 7.1 वाजता होणार आहे. यावेळी मोक्षदा एकादशी सोमवार, 1 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी उपवास देखील केला जाणार आहे.
मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करुन व्रत पाळावे
घरातील देव्हाऱ्यात दिवा लावावा
त्यानंतर चौरंगावर विष्णूची मूर्ती किंवा चित्र ठेवावे.
भगवान विष्णूंना जलप्राशन करा.
त्यानंतर, भगवान हरीला पिवळे कपडे घाला.
यानंतर भगवान विष्णूंना रोळी किंवा तांदूळ लावावे.
नंतर पिवळे अन्न अर्पण करावे
तसेच एकादशीच्या व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी
विष्णू सहस्रनाम मंत्राचा जप करा.
भगवान विष्णूंना समर्पित मंत्रांचा जप करा.
शेवटी, आरती करून पूजा संपवा.
मोक्षदा एकादशी या एकादशीचे नावच मोक्ष दर्शवते. हे व्रत केल्याने मोक्ष मिळतो. या व्रतामुळे सर्व पापांचा नाश होतो. शिवाय, हे व्रत करणाऱ्यांच्या पूर्वजांनाही मोक्ष मिळतो, अशी मान्यता आहे. विष्णु पुराणानुसार, मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने वैकुंठ धाममध्ये स्थान मिळते, असे भगवान श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाला सांगितले होते.
शास्त्रांनुसार, या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने आणि काही विशेष वस्तू अर्पण केल्याने भगवान शिव आणि विष्णू दोघांचेही आशीर्वाद एकाच वेळी प्राप्त होतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे मोक्षदा एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल किंवा पाणी, बेलपत्र, तांदूळ, मध किंवा उसाचा रस, शमीचे पान या गोष्टी शिवलिंगावर अर्पण करु शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मोक्षदा एकादशी 1 डिसेंबर रोजी आहे
Ans: एकादशी तिथीची सुरुवात 30 नोव्हेंबर रोजी रात्री 9.29 वाजता होत आहे. या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबर रोजी सकाळी 7.1 वाजता होणार आहे.
Ans: मोक्षदा एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल किंवा पाणी, बेलपत्र, तांदूळ, मध किंवा उसाचा रस, शमीचे पान या गोष्टी अर्पण कराव्यात






