फोटो सौजन्य- pinterest
महादेवाचा आवडता महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जातो. यावेळी नागपंचमी मंगळवार, 29 जुलै रोजी आहे. लोकांना सापांची भीती वाटत असली तरी, वर्षात एक दिवस असा येतो जेव्हा सापांना घाबरण्याऐवजी त्यांची योग्य विधींनी पूजा केली जाते. कारण हिंदू धर्मामध्ये सापांना देवतांचा दर्जा दिला आहे. नागपंचमीच्या दिवशी जर राशीनुसार महादेवांना अभिषेक केल्यास कालसर्प दोष दूर होतो तसेच महादेव प्रसन्न देखील होतात असे म्हटले जाते.
नागपंचमीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी महादेवांना गंगाजलाचा अभिषेक करावा. यामुळे तुमच्या जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात.
नागपंचमीच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी महादेवाला गाईच्या दुधाचा अभिषेक करावा. तुमची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली सर्व कामे पूर्ण होतील.
नागपंचमीच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी महादेवाला गंगाजलात दुर्वा मिसळून अभिषेक करावा. यामुळे तुम्हाला करिअरमध्ये अपेक्षित यश मिळू शकते.
नागपंचमीच्या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी महादेवाला शुद्ध तुपाचा अभिषेक करावा. यामुळे तुम्हाला व्यवसायात अपेक्षित लाभ आणि यश देखील मिळेल. तसेच तुमचा व्यवसाय वाढू शकेल.
नागपंचमीच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी महादेवाला गंगाजलात रोली मिसळून अभिषेक करावा. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
नागपंचमीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी महादेवाला गंगाजलाचा अभिषेक करावा. हे करुन झाल्यानंतर शिव चालीसा पठण करावे त्यामुळे तुमची कर्जातून सुटका होईल.
नागपंचमीच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांनी महादेवाला पंचामृताचा अभिषेक करावा. असे करणे शुभ मानले जाते.
नागपंचमीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी महादेवांना दुधात मध मिसळून अभिषेक करावा. त्यामुळे तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील.
नागपंचमीच्या दिवशी धनु राशीच्या लोकांनी महादेवांना गाईच्या दुधात केशर मिसळून अभिषेक करावा. यामुळे आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल.
मकर राशीच्या लोकांनी नागपंचमीच्या दिवशी गंगाजलात काळे तीळ मिसळून महादेवांना अभिषेक करावा. त्यामुळे अनेक दोष दूर होण्यास मदत होते.
कुंभ राशीच्या लोकांनी महादेवांना नारळाच्या पाण्याने अभिषेक करावा. यामुळे नातेसंबंधामध्ये कायम गोडवा टिकून राहतो.
नागपंचमीच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी महादेवांना उसाच्या रसाने अभिषेक करावा. यामुळे व्यवसायात वाढ होण्यास मदत होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)