(फोटो सौजन्य: Pinterest)
आजचा दिवस सामान्य राहील. आज माघी गणेश जयंती आहे. आज अंक 4 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह राहू आहे. अशा वेळी राहू ग्रहाचा प्रभाव राहील. आजचा गुरुवारचा दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि गुरूचा अंक 3 आहे. आज मूलांक 3 असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल आणि मूलांक 4 असणाऱ्या लोकांना रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
मूलांक 1
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. समाजात मान सन्मान वाढेल. कायदेशीर बाबतीत अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी अनेक गोष्टी यश मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
Shubh Yog Rashifal: बुध आणि अरुणचा त्रिदशंक योग, या राशीच्या लोकांवर होईल संपत्तीचा वर्षाव
मूलांक 2
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. खर्चामध्ये वाढ होईल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अपेक्षित यश मिळेल. जोडीदारासोबत नाते चांगले राहील.
मूलांक 3
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. नवीन ठिकाणी प्रवास करू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. वादविवाद होण्याची शक्यता.
मूलांक 4
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी दीर्घकाळापासून रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. त्यामुळे तणाव वाढू शकतो. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 5
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला समस्या येऊ शकतात. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा पाठिंबा मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
मूलांक 6
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका आणि रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जाणवेल.
मूलांक 7
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी योजना आखून तुम्ही पुढे जा. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. आरोग्याची काळजी घ्यावी नाहीतर समस्या वाढतील.
Ganesh Jayanti 2026: माघी गणेश जयंतीला करायची आहे का स्थापना? जाणून घ्या पूजा साहित्य यादी
मूलांक 8
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आई वडिलांमध्ये मतभेद होऊ शकतात. शांततेने समस्या सोडवल्यास नातेसंबंध चांगले राहतील. नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.
मूलांक 9
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. वरिष्ठांकडून कौतुक होईल. तुम्हाला तणाव जाणवू शकतो. कुटुंबामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. नातेसंबंध चांगले राहतील. खर्चामध्ये अपेक्षित वाढ होईल.






