फोटो सौजन्य- istock
आजचा रविवारचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी विशेष राहील. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शनीचा प्रभाव राहील. आज रविवार असल्याने आजचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्याचा अंक 1 मानला जातो. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा दिवस आर्थिक बाबतीत उत्तम राहील. तर मूलांक 8 असणाऱ्यांनी आर्थिक बाबतीत सावध रहावे. यावेळी गुंतवणूक करताना सावध रहा. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला उत्तम फायदा होईल आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नातेसंबंध चांगले राहतील.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. यावेळी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय न घेतल्यास नुकसान होऊ शकते. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतल्यास फायदा होईल. कुटुंबामध्ये सुख समृद्धी राहील. तुम्ही जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना आखू शकता.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक राहील. धार्मिक कार्यात आवढ निर्माण होईल. व्यवसायात फायदा होऊ शकतो. एखाद्या अनोळखी लोकांची भेट होईल त्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. जोडीदाराची साथ मिळेल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला नकारात्मक विचारापासून दूर राहायला हवे. नोकरी आणि व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेतल्याने फायदा होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. व्यवसायामध्ये सामान्य स्थिती राहील. मात्र तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. आर्थिक स्थिती सामान्य राहील. कुटुंबासोबत तुम्ही बाहेर जाऊ शकता. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मानसिक ताण जाणवू शकतो. तुम्ही जोडीदारासोबत वेळ घालवू शकता. कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस चांगला राहील.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला थोड सावध रहावे लागेल. कोणतीही गुंतवणूक करताना सावध राहा. कुटुंबासोबत वेळ घालवू शकता आणि मानसिक शांती मिळेल.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तसेच तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची सर्व अपूर्ण कामे पूर्ण होतील त्यामुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो ज्याने तुमचा ताण कमी होईल. तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)